अजिंठा लेणी परिसरात गारपिटीसह जोरदार पाऊस

0

अजिंठा, लोकशाही न्यूज नेटवर्क

ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पावसाचा आनंद मिळत असला तरी, बळीराजा मात्र त्रासाला आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीसह (Ajanta Caves) तोंडापूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून गारपिटीसह जोरदार पाऊस (Unseasonal Rain) झाला. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात लेणीतील घबधबा ओसंडून वाहत असून नदीला पूर आला आहे. हा पूर पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली असून, वीकेंडला पावसाचा आनंद लुटला. अजिंठा लेणीसह तोंडापूर परिसरात शुक्रवारी व शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास एक ते दीड तास जोरदार पाऊस झाला. तसेच डोंगररांगांमध्ये गारपीटही झाली. या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील माल व वीटभट्टीधारकाचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.