Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»महाराष्ट्र दिनानिमित्त ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ सांस्कृतिक कार्यक्रम
    जळगाव

    महाराष्ट्र दिनानिमित्त ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ सांस्कृतिक कार्यक्रम

    लोकयात्रा कलामंचच्या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा प्रभावी आविष्कार
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 30, 2026No Comments64 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या समृद्ध लोकपरंपरा, विविध कलाप्रकार आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे, तसेच नागरिकांमध्ये सांस्कृतिक अभिमान वृद्धिंगत करणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे.

    या कार्यक्रमात ‘लोकयात्रा कलामंच’ यांचे विशेष सादरीकरण सादर होणार असून, लोककला, नृत्य आणि पारंपरिक सादरीकरणांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा रंगतदार आविष्कार अनुभवता येणार आहे. विविध लोकनृत्य आणि कलाप्रकारांच्या सादरीकरणातून प्रेक्षकांना एक वेधक आणि समृद्ध सांस्कृतिक अनुभूती मिळणार आहे.

    हा कार्यक्रम शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता कान्ह ललित कला केंद्र, नाट्य सभागृह, एम. जे. कॉलेज परिसर, एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमाचा शुभारंभ पालक मंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे या कार्यक्रमास खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे महापौर दिपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहण घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.करिष्मा नायर अदी मान्यवर उपस्थित राहाणार आहे

    सदर कार्यक्रम अॅड. आशिष शेलार, मंत्री (सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान), महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून तसेच डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत असून, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने तो साकारला जात आहे.

    हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, जळगाव व परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif