Saturday, January 28, 2023

असा गरबा कधी पाहिलाय का ? (व्हिडीओ)

- Advertisement -

 

उदयपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

नवरात्रीला आज पासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरणासह संपूर्ण देशभरात दांडिया आणि गरब्याची धूम दिसून येत आहे. यावेळी अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील. परंतू जो व्हिडीओ सध्या समोर आला आहे तो पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. बऱ्याचदा आपण पाहिलं आहे की, गरबा-दांडिया हे मोठ-मोठ्या मैदानात किंवा हॉलमध्ये खेळले जातात. परंतू हा गरबा चक्कं स्विमिंग पूलमध्ये खेळला जात आहे.

- Advertisement -

हा व्हिडीओ राजस्थान मधील असल्याची माहिती मिळत आहे, येथील एका संस्थेने गरब्याची ही आगळी-वेगळी कॉन्सेप्ट आणली, जी कदाचित यापूर्वी कधीही कोणी केलं नसेल.

हा व्हिडीओ ANI च्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे, मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ राजस्थानच्या उदयपूर येथील आहे. या व्हिडीओल लोकांनी देखील पसंती दर्शवली आहे, ज्यावर लोक लाईक, शेअर देखील केरत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही तरुण आणि तरुणी गरबा-दांडियाचे पोशाख घालून स्विमिंग पूलच्या पाण्यात डान्स करत आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे