विसर्जनासाठी मेहरून तलाव येथे व्यवस्था, चोख पोलीस बंदोबस्त
जिल्ह्यात 1363 सार्वजनिक मंडळाचे होणार आज विसर्जन
उज्जैनच्या महाकालेश्वरची शही सवारी,अघोरी साधू महाराज ,झांज, डमरू पथक ठरणार आकर्षण
विसर्जन मार्गावर राहणार सिग्नल यंत्रणा, मंडळ करणार दहा मिनिटे सादरीकरण
जळगाव – जिल्ह्यात आज 13 63 सार्वजनिक मंडळातर्फे अनंत चतुर्दशी निमित्त मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येणार असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पार्श्वभूमीवर जळगाव शहरातही 70 सार्वजनिक मंडळे सहभागी झाले असून प्रत्येक मंडळाला मुख्य चौकांमध्ये दहा मिनिटे सादरीकरण करण्यास वेळ मिळणार आहे.
जळगाव शहरातील मानाचा गणपती म्हणून महापालिकेचा गणपती समजला जातो. महापालिकेच्या गणपतीची दुपारी बारा वाजता आरती झाल्यानंतर सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. या ठिकाणी आमदार खासदार जिल्हाधिकारी मनपा आयुक्त कर्मचारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत .मनपा समोरून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होऊन विसर्जन मार्गातील टॉवर चौक घाणेकर चौक चौबे शाळा चौक आदी ठिकाणी तात्पुरते सिग्नल बसविण्यात आले असून रेड लाईट लागतात दहा मिनिटे मंडळे सादरीकरण करून ग्रीन लाईट लागतात मंडळी मार्गस्थ होतील.
यंदा जळगाव शहरात गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर देखावे पाहण्यासाठी प्रचंड संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना सर्वत्र भावपूर्ण वातावरण जरी असले तरी गणपती बाप्पाला जल्लोषात निरोप देण्यासाठी सर्वच जन सज्ज झाले आहेत.
महाराणा प्रताप मित्र मंडळातर्फे उज्जैनची शाही सवारीची मिरवणूक काढली जाणार असून यात अघोरी साधू महाराजांचं झांज डमरू हे याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
नेहरू चौकापासून मिरवणुकीला सुरुवात होणार असून प्रत्येक मंडळांना क्रमांकाचे वाटप करण्यात येणार आहे सकाळपासूनच सर्व मंडळे वाजत गाजत येऊन या ठिकाणी जमणार आहेत. यानंतर मानाच्या गणपतीची आरती होताच बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.
मेहरून तलाव येथे विसर्जनासाठी क्रीम सह तराफे दोन बोटी पट्टीचे पोहणारे तैनात करण्यात आले असून घरगुती मूर्तीचे गणेश घाट येथे विसर्जन करण्यात येणार आहे. मोठ्या मूर्तीचे विसर्जन सेंट टेरेसा स्कूल मागील बाजूला होणार असून गिरणा नदीवर निमखेडी येथे विसर्जनात प्रशासनातर्फे बंदी करण्यात आली आहे.
शहरातील जयप्रकाश नारायण चौकामध्ये महामंडळाकडून वैद्यकीय कक्ष तयार करण्यात आला असून या कक्षामध्ये डॉक्टरांचा स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली असून एक ॲम्बुलन्स येथे तत्पर राहणार आहे. सुभाष चौक गणेश मित्र मंडळातर्फे सायंकाळी सात वाजेपासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत मिरवणुकीत सहभागी झालेल्या सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांना फूड पाकीट वाटप केले जाणार आहे.
असा आहे पोलीस बंदोबस्त
पोलीस अधीक्षक 01, आपर पोलीस अधीक्षक 2 ,डी वाय एस पी १० ,पोलीस निरीक्षक 33, एपीआय ,पीएसआय 144 ,पोलीस 3377, एस आर पी एफ 1कंपनी, होमगार्ड 1477, दामिनी पथक 3 आरसीबी पथक 8, क्यू आर टी पथक 2