गंजेवाडा येथे तिघांना मारहाण ; ५ जणांवर गुन्हा

0

भडगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
दारूच्या नशेत एकाच कुटुंबातील तीन जणांना कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना भडगाव तालुक्यातील गंजेवाडा येथे ११ मार्चला घडली असून याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठोबा बळीराम मिस्तरी (वय-३९) रा.गंजेवाडा ता. भडगाव हा तरूण शुक्रवार १० मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घरी असतांना काहीही कारण नसतांना युवराज मुरलीधर गंजे, सुनिल शिवाजी गंजे, साहेबराव मुरलीधर गंजे, मुरलीधर रतन गंजे आणि तुषार युवराज गंज यांनी विठोबा मिस्तरी व त्याचे वडील विठोबा मिस्तरी व रंजना मिस्तरी यांना बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत युवराज गंजे याने हातात असलेली कुऱ्हाड विठोबा मिस्तरी याच्या डोक्याला मारल्याने ते यात जखमी झाले. याबाबत शनिवारी पाच जणांविरोधात भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.