सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात एका व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढताना पकडण्यात आले असून, या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
जुनेब शेख साबीर (रा. पिंप्राळा हुडको) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रामानंद नगर पोलीस गस्तीदरम्यान परिसरात पेट्रोलिंग करत असताना जुनेब शेख हा गांजा ओढत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार जितेंद्र राठोड करीत आहेत.