Thursday, May 26, 2022

चाळीसगावमध्ये १३ लाखांचा गांजा जप्त; दोन जण ताब्यात

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

चाळीसगावमध्ये तब्बल १३ लाखांचा गांजा जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. धुळेहून चाळीसगावकडे येणाऱ्या एका स्कार्पिओ गाडीची तपासणी केली असता त्यात १३ लाख रुपये किंमतीचा ६२ किलो वजनाचा बेकायदेशीर गांजा आढळून आला. याप्रकरणी दोन जणांना ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

उग्र वास आल्याने केली तपासणी

१८ एप्रिल सोमवार रोजी सायंकाळी चाळीसगाव शहर वाहतूक शाखा व ग्रामीण पोलीस संयुक्तपणे धुळे रोडवरील विराम लॉन्स समोर गस्त घालत होते. यावेळी त्यांना एक नंबर नसलेल्या पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ गाडी आढळून आली. दरम्यान सदर गाडीतून उग्र वास आल्याने त्याची अधिक तपासणी करण्यात आली.

१३ लाखांच्या मुद्देमालासह दोन जण ताब्यात

यावेळी सदर गाडीमध्ये बेकायदेशीर विक्रीसाठी असलेला मुद्देमाल १३ लाख ३६ हजार चारशे रुपये किंमतीचा ६२.०६६ किलो वजनाचा गांजा आढळून आला. सदर मुद्देमाल ग्रामीण पोलीस व शहर वाहतूक शाखेने जप्त केला आहे. तुषार अरूण काटकर (वय २८, रा. दत्तवाडी ता. चाळीसगाव), सुनिल देविदास बेडीस्कर (वय ३८, रा. पिलखोड ता. चाळीसगाव) या दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

यांनी केली कारवाई

याप्रकरणी चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे सपोनि तुषार देवरे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी कैलास गावडे व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे सपोनि तुषार देवरे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश चव्हाण, वाहतूक शाखेचे पोहेकाँ श्रीराम पोपट बोरसे, पोना सचिन देविदास अडावदकर, पोना बापू काशिनाथ पाटील, पोना दिपक पितांबर पाटील, पोना नरेंद्र महादू पाटील, चालक पोहेकॉ रावसाहेब नामदेव पाटील त्याचप्रमाणे चाळीसगाव ग्रामीणचे पोना शांताराम सिताराम पवार, पोना गोवर्धन राजेंद्र बोरसे, पोना ज्ञानेश्वर काशिनाथ बडगुजर, पोना देविदास संतोष पाटील, पोना दिनेश विक्रम पाटील, पोना प्रेमसिंग नरसिंग राठोड व चालक सफौ अनिल आगोणे आदींनी केली आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या