‘गंगुबाई काठियावाडी’ची बॉक्स ऑफिसवर जादू, ‘इतक्या’ कोटींची तुफान कमाई

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

अभिनेत्री आलिया भटचा (Alia Bhatt) गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी केले आहे. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट (25 फेब्रुवारी) प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) ही गंगूबाई काठियावाडी मुख्य भूमिका साकारत असून तिच्याबरोबर शांतनु (Shantanu Maheshwari),अजय देवगण (Ajay Devgan), विजय राज (Vijay Raj), सीमा पाहवा (Seema Pahwa) हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी कोट्यवधींची कमाई केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोयं.

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर (Box office) दहा कोटी कमाई केली. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाने शुक्रवारी 10.5 कोटींचा व्यवसाय केला. त्यानुसार बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे भविष्य चांगले दिसत आहे. इतकंच नाही, तर बॉक्स ऑफिसवर ‘गंगूबाई’समोर ‘वालीमाई’ आणि ‘भीमला नायक’ हे चित्रपटही टक्कर देत आहेत, तरीही चित्रपटाची कमाई जोरदार दिसत आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ने पहिल्या वीकेंडमध्ये 39.12 कोटींचा व्यवसाय केला होता. तर, सोमवारी या चित्रपटाने 8 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे चित्रपटाची एकूण कमाई 4 दिवसात 47.12 कोटींवर गेली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.