Wednesday, September 28, 2022

घृणास्पद प्रकार.. घोरपडीवर सामूहिक बलात्कार; ४ जणांना अटक

- Advertisement -

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

कोल्हापुरातून एक घृणास्पद प्रकार समोर आला आहे. घोरपडीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आठवडाभराने चार जणांना अटक केले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ही धक्कादायक घटना घडली होती. चांदोली राष्ट्रीय उद्यानात अवैधरित्या घुसल्याप्रकरणी चौघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोकणातील आरोपींना अटक केलं आहे. दरम्यान त्यांच्या चौकशीमधून घोरपडीवरील बलात्काराचा प्रकार घडला होता. इतकेच नाही तर घोरपडीवरील लैंगिक अत्याचाराचा व्हिडीओही शूट करण्यात आला होता.

- Advertisement -

- Advertisement -

चौकशी दरम्यान घटना उघड

जंगलात अवैधरित्या घुसल्याप्रकरणी 31 मार्च रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चौघा आरोपींपैकी एकाने शिकारीसाठी बंदूक जवळ बाळगल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यानंतर चौकशी सुरु असताना घोरपडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक कबुली त्यांनी दिली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी अशा चार जिल्ह्यात पसरलेला आहे.

संदीप तुकाराम पवार, मंगेश कामटेकर, अक्षय कामटेकर आणि रमेश घाग या चार आरोपींना अटक करण्यात आले आहे. या चौघांपैकी एकाने घोरपडीवर बलात्कार करतानाचा व्हिडीओही कॅमेरात चित्रित केल्याचं समोर आलं आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक नानासाहेब लडकत यांनी दिलेल्या माहितीनुसार “आम्ही आरोपींकडून संबंधित सर्व पुरावे जप्त केले असून, त्यांना सुरुवातीला वन विभागाची कोठडी देण्यात आली होती, परंतु आता ते जामिनावर बाहेर आहेत”. त्यांना प्रत्येक सोमवारी या प्रकरणाची चौकशी करून वनाधिकाऱ्यासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. या चौघा आरोपींवर वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या