Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»कोलकाता पुन्हा हादरले : विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार
    गुन्हे वार्ता

    कोलकाता पुन्हा हादरले : विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 27, 2025Updated:June 27, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    कोलकाताच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या घटनेनं अख्खा देश संतापला होता. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच कोलकातात एका लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींमध्ये कॉलेजमधील माजी विद्यार्थी आणि दोन कर्मचारी आहेत. या आरोपींची चौकशी करण्यात येत आहे.

    पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी संध्याकाळी साडेसात पासून रात्री १०.५० पर्यंत आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी तिने खूप विनवण्या केल्या; मात्र, त्यांनी वासनांध आरोपींनी तिच्यावर अगणित अत्याचार केले. पीडितेने याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींचा तातडीने शोध सुरू केला. २६ जून रोजी आरोपींना अटक करण्यात आली. तर या घटनेत सामील असलेल्या तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी २६ आणि २७ जूनच्या मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अटक केली.

    पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडील मोबाइल जप्त केले आहेत. तिघांना कोर्टात हजर करण्यात येत आहे. एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपींच्या कुटुंबीयांनाही पोलीस ठाण्यात बोलावलं आहे. त्यांच्याकडे घटनेबाबत चौकशी करण्यात आली. मात्र, कुटुंबीयांकडून याबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही.

    पोलीस सूत्रांनुसार, घटनेनंतर पीडित विद्यार्थिनी पोलीस ठाण्यात गेली. सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार तिने दाखल केली. कॉलेजचे दोन कर्मचारी आणि एका माजी विद्यार्थ्याने कृत्य केल्याचे तिने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत सांगितले. पीडितेच्या तक्रारीनंतर नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये तिची वैद्यकीय तपासणी केली.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये एक माजी विद्यार्थी देखील आहे. त्याने २०२२ मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिला कॉलेजच्या एका रुममध्ये बोलावून घेतले. तिथे तिच्यावर अत्याचार केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026

    भाजप कार्यालय फोडलं : १५-२० हल्लेखोरांचा हल्ला!

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif