Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»गॅस सिलेंडर चोरी करणारी अट्टल टोळी जेरबंद
    गुन्हे वार्ता

    गॅस सिलेंडर चोरी करणारी अट्टल टोळी जेरबंद

    4.27 लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवार्इ
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 29, 2026No Comments442 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    गॅस एजन्सीच्या गोडावूनचे कुलूप तोडून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत एकूण 4 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    फैजपूर व वरणगाव पोलीस ठाण्यांमध्ये दाखल दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास करताना ही कारवाई करण्यात आली. फैजपूर येथील श्रीधर गॅस एजन्सीचे संचालक ललित राणे यांनी दि. 25 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्यांनी गोडावून फोडून सुमारे 3 लाख 11 हजार 800 रुपयांचे 100 भरलेले गॅस सिलेंडर चोरून नेले होते. तसेच वरणगाव येथील घटनेत 57 सिलेंडर चोरीला गेल्याची नोंद होती. या दोन्ही गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने दोन स्वतंत्र तपास पथके तयार केली. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित वाहनांचा मागोवा घेत आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.

    या प्रकरणी शेख बिलाल शेख नवी (वय 32, रा. कासोदा, ता. एरंडोल), वसीम खान शाबीर खान (वय 31, रा. तांबापुरा, जि. जळगाव), चेतन सुरेश काळे (वय 38, रा. नशिराबाद, ता. भुसावळ) यांना अटक करण्यात आली आहे. सखोल चौकशीत आरोपींनी आपल्या इतर साथीदारांसह दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून 62 भरलेले व 95 रिकामे गॅस सिलेंडर तसेच एक सुझुकी बर्गमन मोपेड असा एकूण 4.27 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींना फैजपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद व विनोद गाभणे करीत आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026

    गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!

    September 16, 2026

    उत्सवाला गालबोट : गणपती मिरवणुकीत घुसला कंटेनर

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif