चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्ह्यातील चिमूर शहरातील शासकीय धान्य गोडाऊन मागे एका इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर चिमूर पोलिसांनी छापा टाकला यामध्ये ३४ जुगार बहाद्दूरांना अटक करून ४ लाख ५४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमूर शहरातात एका इमारतीत जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती चा आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकाऱ्यांनी जुगार अड्यावर छापा टाकला. या मध्ये एकुण ४ लाख ५४ हजार १८० रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये जुगार खेळणाऱ्या ३४ आरोपींना अटक करून त्यांच्यावर चिमुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांचा नेतृत्वात सहाय्यक पोलिस निराक्षक निशांत फुलेकर, पोलिस हवालदार अतुल गुरनुले, गणेश मेश्राम, विलास निमगडे, प्रमोद पिसे, सचिन साठे, सचिन खामनकर, पंडीत बळदे, गितेश येलोरे, सतिश झिलपे, भरत घोळवे, अमोल नन्नावरे रमेश हाके यांनी केली.