Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जळगावात जुगाराची फटफट सुरू!
    गुन्हे वार्ता

    जळगावात जुगाराची फटफट सुरू!

    rajelok11@gmail.comBy rajelok11@gmail.comOctober 30, 2026No Comments154 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शहराच्या चौफेर अड्ड्यांचे जाळे : आव्हाणे रस्त्यापासून एमआयडीसीपर्यंत अवैध धंद्यांचा विस्तार

    जळगाव : शहरात अवैध धंद्यांनी पुन्हा डोके वर काढल्याची चर्चा सुरू झाली असून, जुगार अड्ड्यांचा वाढता विस्तार चिंतेचा विषय ठरत आहे. काही काळापूर्वी पोलिसांच्या कारवाईमुळे भूमिगत झालेले जुगार अड्डे पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र समोर आले आहे. आव्हाणे रस्त्यापासून मेहरुण, खदान परिसर, नेरी नाका, गेंदालाल मील, एमआयडीसी, अजिंठा चौफुली, रामानंदनगर आणि पिंप्राळा हुडकोपर्यंत जुगार अड्डे सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. शहराच्या विविध भागांत सुरू असलेल्या या कथित अवैध धंद्यांवर पोलिसांचा वचक आहे की नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
    जळगाव शहरात यापूर्वी एका जुगार अड्ड्यावर वाद झाल्यानंतर परिस्थिती गंभीर बनली होती. या पार्श्वभूमीवर तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शहरातील जुगार अड्डे बंद करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. त्यानंतर या अवैध व्यवसायांना आळा बसल्याचे चित्र निर्माण झाले आणि जुगार अड्डे भूमिगत झाले होते.
    पोलिसांच्या कठोर भूमिकेमुळे अवैध धंदेवाल्यांमध्ये कारवाईची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे शहरातील जुगार अड्डे पुन्हा सुरू होणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, आता परिस्थिती अचानक बदलली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या कार्यकाळातही या अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण राहील, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत विविध भागांत जुगार अड्डे सुरू असल्याच्या तक्रारी समोर येणे ही पोलिस यंत्रणेसाठी निश्चितच चिंतेची बाब आहे.

    आव्हाणे रस्त्यापासून शहराच्या चौफेर विस्तार
    शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आव्हाणे रस्त्यावर जुगार अड्डा सुरू झाला असून त्यानंतर गेल्या महिनाभरात शहराच्या विविध भागांत जुगार अड्ड्यांचे जाळे विस्तारल्याचे चित्र आहे. मेहरुण परिसर, खदान परिसर, नेरी नाका, गेंदालाल मील, एमआयडीसी परिसर, अजिंठा चौफुलीजवळ, रामानंदनगर आणि पिंप्राळा हुडको या भागांचा त्यात समावेश असल्याची चर्चा आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत अशा प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी असताना संबंधित यंत्रणांकडून नेमकी कोणती कारवाई केली जात आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    जुगाराच्या अड्ड्यावर वाद, मग कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न!
    जुगार हा केवळ पैशांच्या व्यवहारापुरता मर्यादित राहत नाही. आर्थिक नुकसान, पैशांच्या देवाणघेवाणीवरून होणारे वाद आणि त्यातून निर्माण होणारे तणाव यामुळे परिसरातील शांततेला बाधा पोहोचण्याची शक्यता असते. अवैध व्यवसायांवर वेळीच नियंत्रण ठेवले नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीतीही नाकारता येत नाही. यापूर्वी जुगार अड्ड्यावरील वादानंतर कठोर भूमिका घ्यावी लागली होती, हा इतिहास विसरून चालणार नाही. भविष्यात अशाच ठिकाणी गंभीर घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. अवैध धंद्यांबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असताना पोलिस प्रशासनाने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेणे अपेक्षित आहे. शहराच्या विविध भागांत गस्त वाढविणे, संशयित ठिकाणांची तपासणी करणे, जुगार खेळविणाऱ्यांविरुद्ध पुराव्यांच्या आधारे कायदेशीर कारवाई करणे आणि कारवाईचा नियमित आढावा घेणे आवश्यक आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    rajelok11@gmail.com

    Related Posts

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    गणेशोत्सवातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या

    November 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif