Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»मनोरंजन»जळगावात तीन दिवस रंगणार ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव
    मनोरंजन

    जळगावात तीन दिवस रंगणार ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

    अजिंठा फिल्म सोसायटी, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 23, 2026Updated:April 23, 2026No Comments99 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    परिक्षा संपल्यानंतर लागणाऱ्या सुट्टीत बालकांच्या मनोरंजनासोबतच त्यांच्यावर उत्तम संस्कार व्हावेत आणि त्यांना जागतिक दर्जाचे सिनेमे पाहता यावेत तसेच पाल्यांसोबत पालकांना देखिल आपले बालपण अनुभवता यावे या उद्देशाने जळगावात दि. २४, २५ आणि २६ एप्रिल असा तीन दिवसीय ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन शहरातील भाऊंचे उद्यान येथील एम्फी थिएटर येथे करण्यात आले आहे.

    अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव संपन्न होणार आहे. या महोत्सवास प्रवेश विनामूल्य आहे.

    दि. २४, २५ आणि २६ एप्रिल दररोज सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या या गंमत जंमत बालचित्रपट महोत्सवात आजच्या डिजिटल युगात मुले मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये व्यग्र असणाऱ्या बालकांना मोठ्या पडद्यावर दर्जेदार, प्रबोधनात्मक आणि आशयघन असणारे मनोरंजनात्मक चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन दि. २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता महापौर दीपमाला काळे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

    चित्रपट हे शिक्षणाचे आणि प्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम आहे. मनोरंजनातून व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी हा एक सुवर्णयोग आहे, त्यामुळे जळगावमधील जास्तीत जास्त बालक – पालकांनी या चित्रपट महोत्सवाचा लाभ घ्यावा.  असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif