जळगावात १६ वर्षीय तरुणीने उचलले टोकाचे पाऊल …
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील सुप्रीम कॉलनीत एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार, ११ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत तरुणीचे नाव सपना विजय तायडे (वय १६, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे आहे. ती आपल्या आई-वडील आणि लहान भावासोबत राहत होती. तिचे वडील विजय तायडे एका खाजगी कंपनीत कामगार आहेत.
शुक्रवारी दुपारी सपनाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरच्यांच्या लक्षात येताच तिला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर कुटुंबीयांनी हंबरडा फोडला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
सपनाने नुकतीच इयत्ता दहावीची परीक्षा पूर्ण केली होती. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही या घटनेचा अधिक तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.