Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»तरुणाचा झाडाला गळफास ; कुसुंबा येथील घटना
    गुन्हे वार्ता

    तरुणाचा झाडाला गळफास ; कुसुंबा येथील घटना

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 17, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तरुणाचा झाडाला गळफास ; कुसुंबा येथील घटना

    जळगाव | प्रतिनिधी

    जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात एका ४२ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दि. १५ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश गायकवाड (वय ४२, रा. कुसुंबा, ता. जळगाव) हे एमआयडीसी परिसरातील एका खाजगी कंपनीत नोकरीस होते. मंगळवारी (दि. १५) रात्री सुमारास त्यांनी आपल्या कुटुंबासह जेवण केले व नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी खोलीत गेले. रात्री सुमारे दहा वाजता त्यांचा मोठा मुलगा राहुल खोलीत गेला असता, त्यांना वडील खोलीत दिसले नाहीत.

    त्याने घराच्या मागील बाजूस पाहणी केली असता, प्रकाश गायकवाड हे निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. हे दृश्य पाहताच मुलाने आक्रोश केला. आवाज ऐकून शेजारी आणि ग्रामस्थांनी धाव घेतली व तातडीने त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

    घटनेच्या वेळी त्यांची पत्नी छाया गायकवाड या माहेरी गेल्या होत्या, तर लहान मुलगा कामानिमित्त हॉटेलवर गेला होता. प्रकाश गायकवाड यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात  करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026

    वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif