चुंचाळे, लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल तालुक्यातील चुंचाळे गावात सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील काल दिनांक १२ डिसेंबर रोजी गैयबनशहा बाबांचा संदल,वाजे-गाजे,ढोल-तासे च्या गजरात मोठ्या उत्सवात काढण्यात आला. गैयबनशहा बाबांचा उर्स शरीफ गावात आहे. त्यालाच पीर बाबांची यात्रा असे म्हणतात.
जुन्या रूढी परंपरा आज सुद्धा गावात राबविण्यात येत आहेत. आज देखील तडवी समाजाचे लग्न या यात्रामध्ये जुळविले जातात. एवढेच नाहीतर अनेक गावांची पाव्हणे मंडळी यात्रे निमित्ताने यांच्या घरी येतात आणि तडवी बांधव हे मोठ्या उत्सवाने ह्या यात्रेचा आनंद घेतात, तर हिंदू बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात या दरग्यावर्ती जातात शेरनी वाटतात गलाफ चढवतात हा उर्स दिनांक आज १३ डिसेंबर रोजी आहे.

तर दुसऱ्या दिवशी १४ डिसेंबर रोजी श्री समर्थ सुकनाथ बाबा यांच्या पदपर्शाने पावन नगरी आणि श्री समर्थ रघुनाथ बाबा यांच्या तपाने पावन तपभूमी असलेले व गुरु माऊली श्री समर्थ वासुदेव बाबा यांची कर्मभूमी म्हणून ज्या गावाला अख्या महाराष्ट्रात ओळख आहे, असे ठिकाण म्हणजे बाबांचा मठ या ठिकाणी सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील श्री दत्त जयंती सोहळा संपन्न होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अगोदरच मंदिरात श्री दत्त पारायणची सुरुवात झाली आहेत.
श्री समर्थ वासुदेव बाबा भजनी मंडळ व बाबा भक्तांनी जनतेने मोठ्या संख्येने दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घावा असे आव्हाहन केले आहे. असे हे दोन्ही ठिकाण सर्वधर्म समभाव असल्याचे चित्र आहे,हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक चुंचाळे नगरीत दिसते.