Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»ग. स. निवडणूक : लोकसहकार गटाचे दोन सदस्य सहकार गटाच्या गळाला
    जळगाव

    ग. स. निवडणूक : लोकसहकार गटाचे दोन सदस्य सहकार गटाच्या गळाला

    Tushar BhambareBy Tushar BhambareMay 12, 2022No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    ग. स. सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी चांगलेच नाट्य रंगत असून सहकारचे सर्वेसर्वा उदय पाटील यांनी लोकसहकारच्या दोन सदस्यांना फोडल्याने निवड प्रक्रियेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

    बुधवारी लोकसहकार आणि प्रगती शिक्षक सेनेच्या पॅनलने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. यात अध्यक्षपदी रावसाहेब पाटील तर उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड हे अर्ज भरणार असल्याची माहिती देखील देण्यात आली. मात्र सायंकाळी सहकार गटाचे नेते उदय पाटील एक फोटो सोशल मीडियात व्हायरल करत आपल्यासोबत अकरा ही मॅजिक फिगर असल्याचे जाहीर केल्याने आजची अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळाले होते. या अनुषंगाने आज दुपारी साडेबारा वाजेपासून सर्व संचालक क्रमाक्रमाने ग. स. सोसायटीमध्ये दाखल झाले. दुपारी एक वाजेपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली.

    दरम्यान, साडेबारा वाजेच्या सुमारास दोन्ही पॅनलचे संचालक सोसायटीत निवड प्रक्रियेसाठी दाखल करत असतांनाच लोकसहकारचे दोन सदस्य हे सहकार पॅनलच्या संचालकांसोबत आल्याने एकच खळबळ उडाली. लोकसहकारच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत या दोघांना सभागृहात जाऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. यामुळे येथे प्रचंड गोंधळ उडाला.

    बराचवेळ संचालकांना मध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. अखेर प्रचंड पोलीस बंदोबस्तात एक वाजता सहकार गटाचे सर्व संचालक लोकसहकारच्या दोन सदस्यांसह सभागृहात दाखल झाले. सभागृहात जाण्याआधी मनोज पाटील म्हणाले की, आमच्या दोन गटाला आमीष देऊन रात्री त्यांना पळवून नेले. यात रवींद्र सोनवणे भडगाव आणि ज्ञानेश्‍वर सोनवणे जळगाव हे दोन सदस्य फुटल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे सहकारचे सर्वेसर्वा उदय पाटील यांनी विरोधकांना जोरदार हादरा दिल्याचे दिसून आले आहे.

     

    G S election jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026

    सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif