Tuesday, November 29, 2022

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “ऊर्जयती-२०२२” कार्यशाळेत एकवटला मार्गदर्शकांचा सूर

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क G. H. Raisoni College

- Advertisement -

येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनिअरीग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड इस्टीट्युशन्स इनोव्हेशन कॉन्सिलच्या वतीने “ऊर्जयती-२०२२” या शीर्षकाखाली इंटर्नप्रणरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम ता. १५ ते २० सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला होता.

- Advertisement -

- Advertisement -

या पाच दिवसीय कार्यशाळेत जळगावातीलच नव्हे तर मुंबई व दुबईतील विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांना या कार्यशाळेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुंबई येथील प्लॅटीनम इंडस्ट्रीचे संचालक क्रिष्णा राणा, सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक प्रा. डी. डी. बच्छाव तसेच रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यशाळेच्या प्रास्ताविकेत संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी “उर्जयती-२०२२” या कार्यशाळेचे उद्देश व रूपरेषा सांगत विध्यार्थ्यांना भविष्यात या कार्यशाळेतील मार्गदर्शकांचे मूलमंत्र नक्कीच कामी पडतील असे सांगितले.

तसेच आपल्या देशाच्या आर्थिक वाढीत फॅमिली बिजनेस मॅनेजमेंटचा नव्वद टक्के वाटा असून फॅमिली बिजनेसच्या वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.  आजच्या तरुण पिढीला नवटेक्नोलॉजीचे सर्वभूत ज्ञान असल्याने या तरुणाईने आग्रहाने आपल्या फॅमिली बिजनेसमध्ये अग्रेसर होऊन कार्यरत व्हायला हवे असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रातील मार्गदर्शक क्रिष्णा राणा यांनी आपल्या बिजनेसमधील अनेक चढ-उतार विध्यार्थ्यांना सांगत त्यातून मार्ग काढत आपला फॅमिली बिजनेस चिकाटी, धैर्य, विश्वास व आपल्या बिजनेस मधील सहकाऱ्यांच्या योग्य साथिने कसा मोठा केला हे सांगितले तसेच ग्राहकांची गरज जाणून बिजनेस करायला हवा व इंटरनॅशनल बिजनेसमध्ये कशा पद्धतीने विविध युक्त्या लढवून यश संपादन करावे यांचे विविध उदाहरणे देत त्यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यानंतर सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक प्रा. डी. डी. बच्छाव यांनी आयुष्यात एखादे ध्येय गाठायचे असेल तर आवडीचे क्षेत्र निवडा आणि त्याचा सातत्याने पाठलाग करा तसेच कठोर मेहनतीने तुमची परिस्थिती बदलू शकते, म्हणून आत्ताच नियोजन करा आणि कामाला लागा असे आवाहन करत त्यांनी आपल्या शिक्षण पेक्षातून उद्योजक पेशात कशी गरुड भरारी घेत यश संपादन केले याचे विविध अनुभव कथन केले. कार्यशाळेचे दुसऱ्या दिवशी ता. १६ रोजी डीष्ट्रीक्ट इंडस्ट्री सेंटर (महाराष्ट्र राज्य) चे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी  तरुण- तरुणींनी लघुउद्योग सुरु करुन उद्योग क्षेत्राकडे वळावे. तरुणांनी व्यवसाय सुरु करण्याचे धाडस करुन कुटुंबाची व जिल्ह्याची उन्नती साधावी, असे आवाहन करुन नवउद्योजकांना प्रशासनाच्यावतीने कर्जपुरवठा व अन्य आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला.

तरुणांनी नाविन्यपूर्ण विचार करुन व्यवसाय करण्याचे धाडस दाखवावे. उद्योगाला चालना देण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक तालुक्यातील तरुणाला उद्योगाची संधी निर्माण व्हावी, या उद्देशाने शासनाचे पोर्टल व  तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उद्योजकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशासन कमी पडणार नाही, अशी खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली. यानंतर सरस्वती डेअरी व सरस्वती ऑटोमोबाईलचे संचालक धवल टेकवानी हे आपल्या व्यवसायातील तिसरी पीढी असल्याचे सांगत आपल्या आजोबांनी म्हणजेच पहिल्या पिढीने कशा पद्धतीने जळगाव सारख्या शहरात आपला दुग्ध व्यवसाय सुरु करून यशस्वी मार्गक्रमण केले हे सांगितले.  त्यांनी दुग्ध व्यवसायासोबत अचानक ऑटोमोबाईल क्षेत्रात कशा पद्धतीने उडी घेत त्याच्यातही यश संपादन केले हे सांगत फॅमिली बिजनेस व कॉर्पोरेट बिजनेस यांच्यातला फरक विविध अनुभव कथन करत विद्यार्थ्यांना सांगितला.

यानंतर विनले पोलीमर्सचे संचालक पोरस संचीती यांनी आपण भविष्यात ज्या बिजनेसमध्ये रस ठेवतो त्या बिजनेसची इत्यभूत माहिती व संशोधन करणे गरजेचे आहे. त्यांनी इंटरनॅशनल मार्केट मध्ये कसा बिजनेस करावा यावर प्रकाश टाकत कोविड १९ मधील विविध समस्यावर कशा पद्धतीने मात करत आपला व्यवसाय त्या परीस्थितदेखील यशस्वी केला यांचे विविध उदाहरणे देत त्यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे तिसऱ्या दिवशी म्हणजेच ता. १७ रोजी किरण पाईप इंडस्ट्रीचे संचालक वैभव नेहते यांनी आयआयएम अहमदाबाद येथून एमबीए केले असून त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले कि नाविन्यपूर्ण प्रकल्प कशा प्रकारे आपल्या उद्योगात अमलात आणू शकतो व याहू व गुगल याचे उदाहरण देत त्यांनी त्याच्या बिजनेस मध्ये काय काय आव्हाने आहेत व ते त्याच्यावर कशा पद्धतीने मात करतात हे विविध उदाहरणे देत त्यांनी मार्गदर्शन केले.

यानंतर खान्देश उद्योग प्रबोधिनीचे संचालक व नवउद्योजक हर्षल विभांडिक यांनी उद्योजक होण्याच्या स्वप्नांना काही वेळा आर्थिक पाठबळ मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तरुण मुंबई, पुण्याची वाट धरतात. ही बाब लक्षात घेऊन तरुणांना जिल्ह्यातच त्यांचा उद्योग सुरू करता यावा यासाठी हर्षल विभांडिक यांनी पुढाकार घेतला आहे.  या अनुशंगाने  विभांडिक यांच्या सहकार्याने अडीच वर्षांत जिल्ह्यात २४ स्टार्टअप सुरू झाले असून त्यातून तरुणांचे उद्योजक होण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे.  बेरोजगारांना कामही मिळाले आहे. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आयडिया असणे आवश्यक असते सांगून स्टार्टअपचे विविध मुद्दे नमूद केले. यांनतर ता. १९ रोजी नवजीवन सुपर शॉपचे संचालक अनिल कांकरिया यांनी कोणत्याही कामाची सुरुवात स्टेप बाय स्टेप करावी व हळु हळु व्यवसायाला मोठे करावे, आपल्या बिझनेस मधील सायन्स ओळखावे व त्याच अनुषंगाने आपण काय करू शकतो याची योजना आखून ताबडतोब कृती करावी. एकत्र कुटुंब व्यवस्थेचे सभासद असलेले अनिलजी कांकरिया म्हणाले की, एकत्र कुटुब चालवण्याचा मुल मंत्र म्हणजे, आपण आपल्या मालमत्तेचे फक्त ट्रस्टी आहोत मालक नाही ह्या विचारातून कुटुंबातील प्रत्येक सदस्यांशी संवाद व वागणे असावे असे ते यावेळी म्हणाले असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.

यानंतर सुरेश फूड वर्ल्ड च्या संचालिका प्रिती मंडोरे यांनी आजच्या महिला या स्वयंपूर्ण आहेत. त्यामुळेच त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळणेही तितकेच गरजेचे आहे. महिलांमध्ये आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करण्याची गरज असून यासाठी घरातल्या प्रत्येक पुरुषाने पुढाकार घेण्याची गरज आहे. महिलांना उद्योग क्षेत्रांत ताकदीची नव्हे, तर फक्त इतरांच्या विश्वासाची गरज तसेच करिअर सुरक्षित करण्यासाठी स्वतःला कायम अद्ययावत ठेवणे गरजेचे असून आपल्यातील ज्ञान, कौशल्य व अनुभव वाढवतानाच आपला दृष्टीकोन हा कायम सकारात्मक व सर्वसमावेशक कसा राहील याकडे लक्ष द्यायला हवे असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शंकाचे निरसरणही उपस्थित मार्गदर्शकानी केले तसेच सदर कार्यक्रमाचे समन्वय प्रा. तन्मय भाले यांनी केले तर एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. राजकुमार कांकरिया, प्रा. डॉ. योगिता पाटील, प्रा. डॉ. मोनाली शर्मा, प्रा. डॉ. ज्योती जाखेटे व आदी प्राध्यापकांनी सहकार्य केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितमजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

“ऊर्जयती – २०२२” मध्ये यांनी केले मार्गदर्शन

प्लॅटीनम इंडस्ट्रीचे संचालक क्रिष्णा राणा, सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक प्रा. डी. डी. बच्छाव, डीष्ट्रीक्ट इंडस्ट्री सेंटर (महाराष्ट्र राज्य) चे महाव्यवस्थापक चेतन पाटील, सरस्वती डेअरी व सरस्वती ऑटोमोबाईलचे संचालक धवल टेकवानी, किरण पाईप इंडस्ट्रीचे संचालक वैभव नेहते, खान्देश उद्योग प्रबोधिनीचे संचालक व नवउद्योजक हर्षल विभांडिक, नवजीवन सुपर शॉपचे संचालक अनिल कांकरिया, सुरेश फूड वर्ल्ड च्या संचालिका प्रिती मंडोरे, स्कूल ऑफ मिनिगफुलचे संचालक प्रा. राकेश गोधवानी व लॅन्डमार्क ग्रुपचे व्यवस्थापक गोपाल चांडक हे उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या