Monday, January 30, 2023

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयात २३ व २४ सप्टेंबर रोजी ‘एआय राष्ट्रीय परिषदे’ चे आयोजन…

- Advertisement -

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

येथील जी एच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स अभियांत्रिकीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागातर्फे तसेच आयइआय चाप्टर नाशिक, कोग्निडो.एआय, इंडेस व स्पारफीसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ व २४ सप्टेंबर रोजी “एआय इंटरनॅशनल समिट २०२२” या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

सदर राष्ट्रीय परिषदेत “आर्टिफिशियल इंटेलिजन्स” या विषयावर विचार मंथन होणार आहे. या परिषदेतील पहिल्या सत्रात बीजभाषक म्हणून मल्टिप्लाय वेंचरचे सहसंस्थापक भूषण पाटील हे “एआय न्यू रिटेल मार्केटिंग” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, दुसऱ्या सत्रात “कॉम्प्युटर विजन इन एआय व प्रॅक्टिकल स्वरम इन इंटेलिजन्स इन एआय” या विषयावर मावेनीर सिस्टीमचे वरिष्ठ सदस्य दीपक प्रधान, आयआयआयटी पुणे येथील प्रा. डॉ. अमृता लिपारे व सुरत येथील एसव्हीएनआयटीचे प्रा. डॉ. प्रशांत शहा हे मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर परिषदेत स्पार्टीफिशियल इनोवेशनचे ट्रेनर सुधीर साजन, इंडिज सोल्युशनचे संचालक अभीज्ञानम गिरी, इंडेज सोल्युशनचे सॉफ्टवेअर डिझाईन अभियंता रोहित कुकरेजा, भारतसाॅफ्ट सोल्युशनचे संचालक योगेश मुरूमकर, मुंबईतील व्हीजेटीआयचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. संदीप एस. उदमले व आदि मार्गदर्शक दोन दिवसीय परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी संशोधक, विद्यार्थी यांनी कॉन्फरन्ससाठी सादर केलेले रिसर्च पेपर आयएसबीएन क्रमांक असलेल्या नामांकित प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित केले जाणार आहेत.

या परिषदेस विविध राज्यामधून अनेक प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित राहणार असून, आर्टिफिशियल इंटेलिजन्स समोरील वर्तमान आव्हाने आणि प्रश्नांच्या संदर्भात विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक तसेच या विषयात कुतूहल असणाऱ्यांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परिषदेच्या संयोजिका व रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा.डॉ. प्रीती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा.डॉ. प्रणव चरखा यांनी केले आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे