जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातून एका पंधरा वर्षीय मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळून नेल्याचा प्रकार सहा सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की सिंधी कॉलनी परिसरात राहणारी पंधरा वर्षे नऊ महिन्याची मुलगी ही सिंधी कॉलनी परिसरात एका शाळेत शिकत असून ती सहा रोजी शाळेत गेली असता अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिल्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास रवींद्र गिरासे करीत आहे.