कुत्र्यांवर खरूज रोगाचे थैमान; माणसांनाही लागण होण्याची शक्यता

0

रजनीकांत पाटील, अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिरुड गावात मोकाट कुत्र्यांवर त्वचारोग पसरलेला आहे. यामुळे अंगावरील केस गळल्याने कुत्रे विद्रुप दिसत आहेत. तर कुत्र्यांपासून हा आजार माणसांवर पसरण्याची भितीही व्यक्त केली जात आहे. असाच प्रकार अमळनेर शहरात देखील पाहवयास मिळतात.

कुत्र्यांच्या केसांची विद्रूप किंवा विसंगत केस गळतात आणि त्वचेला लालसर आणि जाड होते. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने रोखण्यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्याची आवश्यकता आहे. शहरी परिसरात नगरपालिकेच्या वतीने काही उपाययोजना करणे आवश्यक असल्याचीही मागणी जोर धरत आहे. कुत्र्यांची लहान पिले सुद्धा या आजारामुळे बाधित झालेले दिसून येत आहेत.

शिरूर परिसर ग्रामीण भागात या कारणाने गल्लीबोळात लहान बालके नेहमी वावरत खेळत असतात व त्या ठिकाणी गल्लीभरातील कुत्री अंगणात ओट्यावर तर घरात सुद्धा प्रवेश करतात व आपल्या पायांनी अंगाला खाजवत किंवा चाटत असतात. यामुळे अंगावरील जंतू अथवा बॅक्टेरियाचे प्रमाण हे घरात अथवा दालनात पडत असते. यामुळे संसर्ग वाढण्याची भीती मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. याबाबत ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीने याकडे लक्ष द्यावे. अशा आजारी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.