Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»काम अपूर्ण असतांना ठेकेदाराला दिले पूर्ण पैसे!
    ताज्या बातम्या

    काम अपूर्ण असतांना ठेकेदाराला दिले पूर्ण पैसे!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 14, 2026No Comments152 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगाव न.पा चा कारभार : शिवसेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

    जळगाव : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील 25 कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे शहरात पूर्ण काम झालेले नसताना चाळीस टक्के काम अपूर्ण बाकी असताना संबंधित ठेकेदाराला पूर्ण रकमेची बिले नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांनी दिल्याने तो ठेकेदार आता उर्वरित बाकी असलेले काम 40 टक्के काम पूर्ण करेल का? त्या संबंधित ठेकेदाराला पूर्ण बिले देण्याची कुठल्यास सभेची मंजूरी न घेता परस्पर पूर्ण बिले देण्याचा घाट का घालण्यात आला. या सर्व प्रकाराची समितीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक आणि शिवसेना पक्षातर्फे जिल्हाधिकारी यांना दोन स्वतंत्र निवेदने देऊन करण्यात आली आहे.
    जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, वरणगांव नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजना सुवर्ण जयती नगररोथ्यान योजने अतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून शहरात नवीन जलवाहिनी, नवीन पाण्याच्या टाक्या इत्यादी कामे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. परंतु सदर योजनेचे काम साठ टक्के झाले असून उर्वरित चाळीस टक्के काम हे अपूर्ण अवस्थेत असताना देखील पूर्ण काम झालेले नाही आणि संबंधित ठेकेदार अरिहंत कन्स्ट्रक्शन प्रा.लि या कंपनीला पूर्ण रकमेचा म्हणजे 5 कोटी 62 लाख 10 हजार दोनशे 62 रुपयांची रक्कम ठेकेदाराला देण्यात आली. ही रक्कम मिळाल्यानंतर शहरात बाकी असलेले उर्वरित कामे हा ठेकेदार करेल का? तो पुन्हा वरणगावला येईल का? असे एक ना अनेक प्रश्न या माध्यमातून निर्माण होत आहे. विशेष म्हणजे तत्कालीन मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांची 31 मार्च रोजी बदली झाली आणि पदभार सोडल्यानंतर 2 एप्रिल रोजी सोनवणे यांच्या स्वाक्षरीने अरिहंत कन्स्ट्रक्शन कंपनीला चेक देण्यात आला. बदली झाल्यानंतर रवींद्र सोनवणे यांच्या स्वाक्षरीने संबंधित ठेकेदाराला मोठ्या रकमेचा चेक का देण्यात आला याची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

    मंजुरी न घेता परस्पर दिली रक्कम
    25 कोटी रूपये योजनेच्या पाणी पुरवठा योजनेचे काम सध्या अपूर्ण स्थितीत असताना नगराध्यक्ष सुनील काळे आणि मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे या दोघांनी संगनमताने नगरपरिषदेच्या कोणत्याही विषय समितीची किंवा सर्वसाधारण सभेची पूर्वमंजुरी न घेता, सदर ठेकेदाराला मोठी रक्कम (देयक) परस्पर अदा केली आहे. या सर्व प्रकाराची समिती नेमून चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या गटनेत्या तृप्ता समाधान महाजन, नगरसेवक राजेंद्र चौधरी, विनोद झोपे, इरफान खाटीक यांच्यासह शिवसेना पक्षातर्फे उपजिल्हाप्रमुख विलास मुळे, भुसावळ विधानसभा प्रमुख संतोष माळी, तालुका समन्वयक सुरेश चौधरी यांनी जिल्हाहिकारी रोहन घुगे यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे.

    ही आहेत अपूर्ण कामे
    प्रतिभानगर जलकुंभ बांधणे, विकास कॉलनी जलकुंभ बांधणे, पवन नगर येथे पाईप लाईन टाकणे, सिध्देश्वरनगर प्रतिभानगर इत्यादी ठिकाणी नळ जोळणी बाकी आहे. तरीही ठेकेदाराला लाभ मिळवून देण्यासाठी घाईघाईने देयक काढले गेले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif