Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»एसबीआय क्रेडीट कार्ड विभागातून बोलतोय सांगत तरुणाला सव्वा लाखांचा गंडा
    गुन्हे वार्ता

    एसबीआय क्रेडीट कार्ड विभागातून बोलतोय सांगत तरुणाला सव्वा लाखांचा गंडा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 3, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एसबीआय क्रेडीट कार्ड विभागातून बोलतोय सांगत तरुणाला सव्वा लाखांचा गंडा

    जळगाव (प्रतिनिधी) – ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, शहरातील एका नोकरदार तरुणाला तब्बल १ लाख ३२ हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात फिर्यादीने कोणतीही गोपनीय माहिती न दिल्यानेही संशयितांनी फसवणूक केली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    निमखेडी रोड, शिवधाम मंदिराजवळ राहणारे प्रणेश प्रकाश ठाकूर (वय ३४) यांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. कॉल करणाऱ्याने स्वतःला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड विभागातील अधिकारी म्हणून सांगितले. त्याने क्रेडिट कार्ड संदर्भात माहिती विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रणेश ठाकूर यांनी कोणतीही माहिती दिली नाही. तरीदेखील काही वेळातच त्यांच्या क्रेडिट कार्डमधून १,३२,हजारची रक्कम काढण्यात आली आणि त्यांची आर्थिक फसवणूक झाली.

    हा प्रकार लक्षात येताच प्रणेश ठाकूर यांनी तातडीने तालुका पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास सुरू आहे.

    या प्रकारामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, फसवे कॉल येताच कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक व आर्थिक माहिती उघड करू नये, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #Jalgaon Taluka Police Online Fraud
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif