Tuesday, November 29, 2022

शेतकऱ्यांना दिलासा ! यंदा उसाला मिळणार 3 हजार 50 रुपयांची FRP

- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. मोदी सरकारने साखर हंगाम 2022-23 साठी ऊस उत्पादकांना साखर कारखान्यांद्वारे देय असलेल्या उसाच्या रास्त आणि किफायतशीर किंमतीला (FRP for Sugarcane) मान्यता दिली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

केंद्र सरकारने उसाचा भाव म्हणजे FRP ही 305 रुपये प्रतिक्विंटल निश्चित केली आहे.

आता उसाची FRP ही प्रतिटन 3 हजार 50 रुपये असणार आहे. कॅबिनेट समितीने (CCEA) ऑक्टोबर 2022 पासून सुरु होणाऱ्या खरेदी वर्षासाठी उसाच्या दरात वाढ केली. यापूर्वी प्रतिक्विंटल उसाची FRP ही 290 रुपये होती. त्यामध्ये 15 रुपयांची वाढ करण्यात आली आहे देशात मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकरी आहेत.

असे असताना मात्र उसाचा खर्च मोठ्या प्रमाणवर वाढला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. वाढीव एफआरपी साखर हंगाम 1 ऑक्टोबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत असेल. सध्या खताच्या मजुरीच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. यामुळे शेतकरी याबाबत मागणी करत आहेत. 2021 मध्ये एफआरपी केवळ 5 रुपयांनी वाढवून 290 रुपये करण्यात आली.

दरम्यान, सरकार ऊस (नियंत्रण) आदेश, १९६६ अंतर्गत एफआरपी निश्चित करते. यासाठी कृषी खर्च आणि किंमत आयोग शिफारस करतो. एफआरपीमध्ये प्रति क्विंटल 15 रुपयांनी वाढ करण्याची कॅबिनेट नोट यापूर्वीच जारी करण्यात आली होती. एफआरपी वाढल्यानंतर काही राज्यांच्या सरकारांवर उसाच्या दरात वाढ करण्याचा दबावही वाढतो.

खते, पाणी, कीटकनाशके, मजूर सर्वच महाग झाले आहेत. त्यानुसार भावात वाढ करावी. मात्र, केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी एक आकडा जाहीर केला होता. त्यानुसार 2013-14 च्या साखर हंगामात उसाची एफआरपी केवळ 210 रुपये प्रतिक्विंटल होती. पण तो ९.५ टक्के साखर वसुलीवर आधारित होता.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या