Thursday, May 26, 2022

सरकारी नोकरीचे अमिष दाखवून 1 कोटी रुपयांना लावला चुना

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

नाशिक : शहरातील नांदगाव येथील . रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 1 कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी चेतन शिवाजी इघे (रा. नांदगाव) व साक्षीदार यांना रेल्वेत तिकीट चेकर (टीटी), गेटमन पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून संशयित ज्ञानेश्वर नथ्थू सूर्यवंशी (रा. पवननगर, सोयगाव, ता. मालेगाव) याने फसवणूक केल्याचे म्हटले आहे. फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून यावेळी पैसे घेऊन फसवणूक केल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

तसेच दुसरा संशयित सतीश गुंडू गुच्चे (रा. पुणे), संतोष शंकर पाटील (रा. वंडर सिटी काञज) यांनी या कामी नोकरीस लागणारे बनावट कागदपत्र बनविले. मात्र, नोकरी मिळाली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी ज्ञानेश्वर सूर्यवंशी यास अटक केली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक सचिन पाटील, पो. नि. रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने केली.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या