Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    जळगाव

    ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर

    ‘न्याय विश्वास फाउंडेशन’तर्फे विशेष आयोजन
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 7, 2026No Comments53 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    प्रत्येकाला योग्य कायदेशीर मार्गदर्शन सहज उपलब्ध व्हावे, या सामाजिक उद्देशाने ‘न्याय विश्वास फाउंडेशन’तर्फे ९ ऑगस्ट रोजी मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम संचालित या फाउंडेशनचे हे दुसरे शिबिर असून, ते सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ठाकूर समाज मंगल कार्यालय, पिंप्राळा (जळगाव) येथील सभागृहात पार पडणार आहे. न्याय विश्वास फाउंडेशन’च्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी पहिले मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिर गेल्या महिन्यात यशस्वीरीत्या पार पडले होते. त्या शिबिरात २५० हून अधिक नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या विविध शंकांचे निरसन करून घेतले होते. पहिल्या शिबिराला जळगावकरांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहूनच या दुसऱ्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

    या शिबिरामध्ये नागरिकांना जमिनीचे वाद, ७/१२ उताऱ्याशी संबंधित प्रश्न, मालमत्तेचे हक्क, पती-पत्नीमधील वाद, कौटुंबिक प्रकरणे, पोलीस तक्रारी, एफआयआर, न्यायालयीन प्रकरणे, सायबर गुन्हे व ऑनलाईन आर्थिक फसवणूक, तसेच महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर हक्क यांसह विविध विषयांवर मोफत सल्ला दिला जाणार आहे. याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना सरकारी मोफत कायदेशीर मदत कशी मिळू शकते, याविषयीही तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती दिली जाणार आहे. शिबिरास उपस्थित राहताना नागरिकांनी शासकीय ओळखपत्र जसे की, आधार कार्ड किंवा अन्य वैध ओळखपत्र, संबंधित जमिनीची व मालमत्तेची कागदपत्रे, तसेच पोलीस अथवा न्यायालयाशी संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

    दैनंदिन जीवनात कोर्ट-कचेरी, जमिनीचे वाद, मालमत्तेचे प्रश्न, पोलीस तक्रारी, कौटुंबिक वाद किंवा विविध कायदेशीर कागदपत्रांबाबत अनेक नागरिक संभ्रमात असतात. योग्य माहितीच्या अभावामुळे अनेकदा अनावश्यक मानसिक, आर्थिक व कायदेशीर त्रास सहन करावा लागतो. हीच अडचण दूर करण्यासाठी न्याय विश्वास फाउंडेशन जळगाव अनुभवी वकिलांच्या सहभागातून हे मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करत आहे.

     ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम, अध्यक्ष, न्याय विश्वास फाउंडेशन

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif