Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»आरोग्य»बालरंगभूमी परिषद व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी
    आरोग्य

    बालरंगभूमी परिषद व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी

    अरुश्री हॉस्पिटलच्या सहकार्याने स्व.ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिबिराचे आयोजन
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 3, 2026No Comments54 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    स्व. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘जीवनरंग विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे’ देखील आयोजन करण्यात आले आहे. बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा, अरुश्री हॉस्पिटल आणि मुक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर मंगळवार (दि.३०) रोजी अरुश्री हॉस्पिटल येथे सकाळी ८ ते १२ या दरम्यान पार पडले.

    रिंगरोडवरील अरुश्री हॉस्पिटलच्या डॉ.परिक्षीत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.स्वाती बाविस्कर यांच्या विशेष सहकार्याने झालेल्या या आरोग्य तपासणी शिबिराला मुक्ती फाऊंडेशन जळगावचेही सहकार्य लाभले होते. उद्‌घाटन प्रसंगी नटराज पूजन करुन आरोग्य तपासणीला सुरुवात करण्यात आली. नटराज पूजन प्रसंगी अरुश्री हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.स्वाती बाविस्कर, मुक्ती फाऊंडेशनचे मकुंद गोसावी, बालरंगभूमी परिषद जळगावचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष पंकज बारी, नेहा पवार – गुजराथी, कोषाध्यक्ष सचिन महाजन यांची उपस्थिती होती. उद्‌घाटनानंतर डॉ.स्वाती बाविस्कर यांनी उपस्थित कलावंतांना आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी व औषध घेतांना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.

    शिबिरात डॉ.स्वाती बाविस्कर, डॉ.हर्ष चौधरी, श्री.राहुल बनसोडे व अरुश्री हॉस्पिटलमधील आरोग्यसेवकांनी सहभागी कलावंतांच्या सीबीसी रक्त तपासणी, रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब तपासणी, ईसीजी आदी तपासण्या केल्या तसेच आवश्यक औषधांचे विनामूल्य वितरण केले. या शिबिराचा लाभ शहरातील ३८ कलावंतांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विनोद ढगे यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे दिपक महाजन, मोहित पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, दर्शन गुजराथी, राहुल पवार यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif