Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»धानोरा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात
    जळगाव

    धानोरा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात

    एकूण 453 महिला, पुरुषांनी घेतला शिबीराचा लाभ
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 7, 2026No Comments63 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. ६) चोपडा तालुक्यातील धानोरा येथील सूर्यवंशी गुजर समाज सतपंथ मंदिरात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून एकूण ४५३ महिला व पुरुषांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला.

    या शिबिरात महिलांसाठी व किशोरवयीन मुलींसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी, औषध वाटप आणि आरोग्य समुपदेशन करण्यात आले. तसेच सर्वांसाठी मोफत दंत तपासणी व नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली.

    शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे, मानद सचिव स्वाती ढाके, डॉ. पराग जहागीरदार, डॉ. तुषार फिरके, डॉ. काजल फिरके, रोटे. संदीप शर्मा, डॉ. माधुरी कासट, डॉ. हर्षदा पाटील, डॉ. ज्योती चौधरी, डॉ. पवन बजाज आणि डॉ. हर्षवर्धन जोशी उपस्थित होते.

    यावेळी विजय जोशी, योगेश गांधी, सुबोध सराफ, राकेश चव्हाण, सुनील नानकर, सतपंथ मंदिर सेवा समितीचे विजय महाराज, गजानन चौधरी, सुरेंद्र महाजन, अध्यक्ष प्रदीप महाजन तसेच वासुदेव महाजन यांचीही प्रमुख उपस्थिती होती. शिबिराच्या पूर्वतयारी व आयोजनासाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे गिरीश कुलकर्णी, सुधीर पाटील, प्रशांत सूर्यवंशी, चंद्रकांत चौधरी आणि विक्रम अस्वार यांनी मोलाचे सहकार्य केले.

    धानोरा, पंचक, मोहरद, पारगाव, चिंचोली, देवगाव, खोरगाव, अडावद आदी गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेतला. गावकऱ्यांनी अशा प्रकारची आरोग्य शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब जळगाव, गांधी रिसर्च फाउंडेशन आणि सतपंथ मंदिर सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif