Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»ऑनलाइन ट्रेडिंगच्या आमिषाने १९ लाखांची फसवणूक
    गुन्हे वार्ता

    ऑनलाइन ट्रेडिंगच्या आमिषाने १९ लाखांची फसवणूक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 6, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ऑनलाइन ट्रेडिंगच्या आमिषाने १९ लाखांची फसवणूक

    शेअर्समध्ये ‘मोठा नफा’ दाखवून लुबाडले

    जळगाव प्रतिनिधी ऑनलाइन शेअर्स ट्रेडिंगमध्ये भरघोस नफा मिळेल,असे आमिष दाखवून भुसावळ येथील एका नागरिकाची तब्बल १९ लाख १ हजार ९९९ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नत्थू प्रजापती प्रसाद (वय ४९, रा. भुसावळ) यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फिर्यादी नत्थू प्रसाद यांच्या तक्रारीनुसार, ९ ऑगस्ट २०२५ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत आरोपींनी अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने ही आर्थिक फसवणूक केली. फिर्यादीला ‘५५७ एस-के स्ट्रॅटेजी क्लब’ आणि ‘डी३ स्ट्रॅटेजिक ट्रेडिंग ग्रुप’ अशा दोन ऑनलाइन ग्रुपमध्ये सामील करण्यात आले. या ग्रुपमध्ये प्रीती यादव, नीता जैन आणि ग्रुपचा अॅडमिन अॅडम सॅमनिओटिस यांनी शेअर्स ट्रेडिंगद्वारे मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

    शेअर बाजारात कमी गुंतवणुकीत जास्त लाभ मिळतो, अशा प्रकारचे संदेश, चार्ट्स आणि खोट्या कमाईचे स्क्रीनशॉट्स दाखवून आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी विविध बँक खात्यांत ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगितले. त्या आश्वासनांवर विश्वास ठेवून नत्थू प्रसाद यांनी तब्बल १९ लाख रुपयांहून अधिक रक्कम आरोपींकडे वर्ग केली.

    मात्र, पैसे जमा झाल्यानंतर आरोपींनी कोणताही नफा न देता, मूळ रक्कमही परत करण्यास नकार दिला. व्यवहाराबाबत शंका निर्माण झाल्यानंतर नत्थू प्रसाद यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. तक्रारीवरून तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime Cyber Police jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    गणेशोत्सवातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या

    November 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif