रेल्वेत नोकरीचे आमिष ; साडेनऊ लाखांचा गंडा

0

रेल्वेत नोकरीचे आमिष ; साडेनऊ लाखांचा गंडा

भुसावळ – रेल्वे विभागात हेड क्लार्क पदावर नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत तब्बल ९,६४,०६० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार भुसावळमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रशांत लक्ष्मीनारायण अग्रवाल (रा. गडकरी नगर, भुसावळ) याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसंत जानबाजी ढोणे (वय ६६, निवृत्त रेल्वे पोलीस) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावण्याचे आश्वासन देत आरोपी अग्रवाल याने सात लाख रुपयांची मागणी केली होती. ढोणे यांना एका परिचित महिलेमार्फत अग्रवालची ओळख झाली होती.

विश्वासात घेऊन अग्रवाल याने ढोणे यांच्याकडून टप्प्याटप्प्याने एकूण ९,६४,०६० रुपये उकळले. यानंतर एक बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले, मात्र त्यावर कोणतीही अधिकृत स्वाक्षरी अथवा शिक्का नव्हता. शंका आल्यानंतर अग्रवालने लवकरच खरे नियुक्तीपत्र देतो, असे सांगून वेळ काढला. नंतर त्याने फोन टाळण्यास सुरुवात केली.

अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ढोणे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार प्रशांत अग्रवाल याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.