Tuesday, November 29, 2022

नोकरीचे आमिष; युवकाची ५ लाखाची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल…

- Advertisement -

 

- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

- Advertisement -

- Advertisement -

हल्ली नोकरी मिळवणे तरुणांसाठी फार मोठी कसोटीच आहे. नोकरीसाठी तरुण वाटेल ते करण्यासही तयार होतात. आणि मग काही लोक त्यांचा फायदा घेत त्यांची फसवणूक करतात. असाच प्रकार आखतवाडे. त. पाचोरा येथे घडला आहे.

सविस्तर वृत्त असे की, गणेश मोतीलाल गढरी (३२) या युवकाला शिपाई पदावर नोकरी लावुन देतो असे सांगत गणेश गढरी याचा चुलत मामा जगन पवार रा. मोहलाई ता. सोयगाव जि. औरंगाबाद यांनी आपल्या परिचयातील सागर बागुल रा. एकलहरे, मेन गेट सामनगांव रोड, ता. जि. नाशिक व एस. पी. बोडखे रा. डोंबिवली ता. कल्याण जि. ठाणे यांचेशी गणेश गढरी यांची ओळख करुन दिली. दरम्यान गणेश यास नोकरी लावुन देतो असे आमिष दाखवत दि. १९ मार्च २०२१ ते दि. १९ जानेवारी २०२२ या कालावधीत गणेश गढरी याच्याकडुन सागर बागुल याने फोन पे वर वारंवार पैशांची मागणी करत तब्बल ५ लाख २५ हजार रुपये उकळले.

गणेश गढरी याने सागर बागुल व एस. पी. बोडखे यांना नियमित फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता सागर बागुल याचा मोबाईल बंद तर, एस. पी. बोडखे हे ठराविक कालावधी मागुन पैसे देतो असे सांगत वेळ मारुन नेत असल्याने गणेश गढरी याने दि. २२ आॅगस्ट २०२२ रोजी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत सागर बागुल व एस. पी. बोडखे यांच्या विरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.‌ या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या