Monday, August 15, 2022

तरूणीला नोकरीचे आमिष देत ३१ हजारात गंडवले

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जळगाव शहरातील वाघ नगर येथील २६ वर्षीय तरुणीला इंडिगो एअरलाइन्स डेमोस्टिक कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष देत ३१ हजार रुपयात गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २५ जानेवारी रोजी रात्री जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

मीनाक्षी विश्वासराव इंगळे (वय २६, रा. वाघ नगर सावखेडा शिवार, जळगाव) ही तरुणी आपल्या कुटुंबियांसह राहते. ८ जुलै २०२१ रोजी त्यांच्या नंबरवर एका अनोळखी नंबरने मेसेज टाकून इंडिगो एअरलाइन्स डेमोस्टीक येथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. यासाठी त्यांनी १३ जुलै रोजी १३ हजार रूपये ऑनलाईन पध्दतीने पैसे ट्रान्सफर केले. पैसे भरून नोकरी मिळाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे समजले.

तरूणीने मंगळवारी २५ जानेवारी रोजी रात्री १२ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तरूणीच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात संशयित आरोपी बँक अकाउंट धारक सनोज कुमार, अवंतिका ठाकूर, सिमरन आणि प्रीती (पुर्ण नाव माहित नाही) यांच्यासह एक जण असे एकुण ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे करीत आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या