मुलाला सरकारी नोकरी लावण्याचे आमिष देऊन शेतकऱ्याला २ लाखांचा गंडा

0

मुलाला सरकारी नोकरी लावण्याचे आमिष देऊन शेतकऱ्याला २ लाखांचा गंडा

तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

जळगांव I लोकशाही न्यूज नेटवर्ज

चाळीसगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून २ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शांताराम महादू पाटील (वय ५३, रा. मुंदखेडे बु., ता. चाळीसगाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, २४ डिसेंबर २०२४ रोजी जळगाव रेल्वे स्टेशनजवळील सार्वजनिक रस्त्यावर संशयित आरोपींना ही रक्कम देण्यात आली. बाळासाहेब ऊर्फ ज्ञानेश्वर हरचंद पाटील (रा. उत्रान, ता. एरंडोल), भिवसन महाले (रा. मेहुटे, ता. पारोळा) आणि खंडू बापू महाले (रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव) यांनी संगनमताने शांताराम पाटील यांच्या मुलाला सरकारी नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन दिले. त्यांनी शांताराम यांच्याकडून २ लाख रुपये उकळले आणि फसवणूक केली. पैसे परत मागितले असता, खंडू महाले याने शांताराम यांना फोनवर शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी २९ सप्टेंबर रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तिन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.