Sunday, November 27, 2022

बनावट दस्तावेज नाशिक येथील फर्मची तिघांकडुन फसवणूक – गुन्हा दाखल…

- Advertisement -

 

- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क:

- Advertisement -

- Advertisement -

नाशिक येथील एका सी. ए. फर्मचे बनावट दस्तऐवज बनवुन पाचोऱ्यातील तिघांनी मिळून फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदरची बाब नाशिक येथील मुख्य फर्म चालकाच्या लक्षात येताच त्यांच्या फिर्यादीवरून पाचोरा येथील तिघांसह एका अन्य फर्मच्या विरुध्द पाचोरा पोलिसात फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून या प्रकारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तुषार जयंत सोनवणे (३०) धंदा – व्यवसाय (सी. ए) रा. शाॅप नं. ५, गिरणार हाईट्स, राजपाल काॅलनी, मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक. व अर्चना तेजराज सोनवणे (सी. ए.) असे दोघांनी मिळुन सोनवणे अॅन्ड कंपनी या नावाची सी.ए फर्म २०१५ पासुन नाशिक येथे चालवित आहेत. त्यांच्या फर्मचा मेंबरशीप नंबर एफ.आर.एन. १४४३४०W असा असुन त्यानुसार ते नाशिक येथे काम करतात. दि. २२ आॅगस्ट २०२२ रोजी तुषार सोनवणे यांना अज्ञात व्यक्ती कडून पाचोरा जि. जळगाव येथे सी.ए. फर्मची शाखा सुरु असल्याची विचारणा झाली. त्यानंतर त्यांनी खात्री केली असता सोनवणे अॅन्ड कंपनी या नावाची सी.ए. फर्म पाचोरा जि. जळगाव येथे सुरु असल्याचे कळले.

तुषार सोनवणे यांनी अधिक चौकशी केली असता. पीपीएस अॅण्ड असोशिएट्स व सोनवणे अॅण्ड कंपनी अशा नावाने शंतुन सोनवणे, फारुक पिंजारी, महेंद्र पाटील सर्व रा. पाचोरा यांनी संगनमताने सुमारे दोन ते तीन वर्षापासुन तुषार सोनवणे यांच्या सोनवणे अॅण्ड कंपनी या बनावट नावाने लोकांचे इनकम टॅक्स रिटर्न्स व टॅक्सेशनचे व बॅंकेला लागणारे इतर कागदपत्र बनविल्याचे व तुषार सोनवणे यांच्या फर्मचा मेंबरशीप नंबर एफ. आर. एन. १४४३४०W असा असलेला खोटा रबरी स्टॅम्प (शिक्का) बनवुन सोनवणे अॅण्ड कंपनी नावाने कोणताही कायदेशीर अधिकार नसतांना बनावटीकरण करुन चुकीचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. तसेच पाचोरा येथील एम. बी. मिस्तरी असोशिएट्स टॅक्स प्रक्टीशनर यांनी सुध्दा तुषार सोनवणे यांच्या फर्मचा मेंबरशीप नंबर एफ. आर. एन. १४४३४०w असलेला बनाबट शिक्का वापरुन आयकर विवरण पत्र व इतर कामे केली असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे वरील लोकांनी फसवणुकीच्या उद्देशाने बनावटीकरण करुन तुषार सोनवणे व अर्चना सोनवणे यांच्या सोनवणे अॅण्ड कंपनी च्या नावाने लोकांची बनावटीकरण करुन फसवणुक केली असल्याने शंतनु सोनवणे (पुर्ण नाव माहीत नाही), फारुख पिंजारी (पुर्ण नाव माहीत नाही), महेंद्र पाटील (पुर्ण नाव माहीत नाही) व एम. बी. मिस्तरी असोशिएट्स यांचे विरुध्द तुषार सोनवणे यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन, या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या