Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने लेखापरीक्षकाची फसवणूक
    गुन्हे वार्ता

    क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने लेखापरीक्षकाची फसवणूक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 24, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने लेखापरीक्षकाची फसवणूक

    जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

    जळगाव | प्रतिनिधी क्रेडीट कार्ड बंद करून नवीन कार्ड काढून देतो, असा बहाणा करीत आवश्यक कागदपत्रे मिळवून सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षकाची तब्बल ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना गणेश कॉलनी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी कपिल पाटील नामक व्यक्तीविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    मोहन वेरांग्या पावरा (रा. दादावाडी) हे शहरातील गणेश कॉलनी भागातील ‘दुसरे विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था (साखर)’ कार्यालयात लेखापरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. दि. २९ जानेवारी रोजी कामावर असताना कपिल पाटील नावाचा व्यक्ती त्यांच्याकडे आला. त्याने जुने क्रेडीट कार्ड बंद करून नवीन कार्ड तयार करून देण्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करत त्याने पावरा यांच्याकडून आधारकार्ड व पॅनकार्डची प्रत घेतली.
    यानंतर पावरा यांच्या नावाने नवीन क्रेडीट कार्ड काढण्यात आले; मात्र त्यावर स्वतःचा मोबाईल क्रमांक अपडेट करून संबंधित व्यक्तीने कार्डवर पूर्ण नियंत्रण मिळवले. पुढील काही दिवसांत वेळोवेळी या कार्डवरून एकूण ४९ हजार ३८ रुपये काढून घेतल्याचे पावरा यांच्या निदर्शनास आले. वारंवार पाठपुरावा करूनही रक्कम परत न मिळाल्याने अखेर त्यांनी दि. २२ डिसेंबर रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
    तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कपिल पाटील याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या फोन कॉल्स व व्यक्तींपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime #fraud jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला

    November 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif