Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धक्कादायक : वधूचे लग्नाच्या तिसऱ्या दिवशी दागिन्यांसह पलायन
    गुन्हे वार्ता

    धक्कादायक : वधूचे लग्नाच्या तिसऱ्या दिवशी दागिन्यांसह पलायन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 16, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धक्कादायक : वधूचे लग्नाच्या तिसऱ्या दिवशी दागिन्यांसह पलायन

    जळगावच्या तरुणाची दोन लाखांहून अधिक फसवणूक

    जळगाव प्रतिनिधी
    जळगावात एका तरुणाचे लग्न एजंटच्या मध्यस्थीने ठरवण्यात आले, मात्र नववधूने लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी ८४ हजार रुपयांचे दागिने घेऊन घरातून पसार होत वरपक्षाची तब्बल २.४४ लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार १४ ते २३ फेब्रुवारी दरम्यान घडला असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात वधूसह एजंट आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    लग्नासाठी मोठी रक्कम देऊनही फसवणूक

    रामेश्वर कॉलनीतील २७ वर्षीय रिक्षाचालक तरुण कुटुंबासह राहतो. बराच काळ वधू न मिळाल्याने त्याच्या आईने बऱ्हाणपूर येथील एजंट आशाबाई हिच्याशी संपर्क साधला. आशाबाईने पूजा गंगाराम गावडे (रा. पिपरी महेपाल, जि. यवतमाळ) ही मुलगी दाखवली आणि एकूण १.६० लाख रुपयांचा व्यवहार ठरला.

    १८ फेब्रुवारी रोजी एजंट आशाबाई, वधू पूजा गावडे, तिची आई निर्मलाबाई डोंगरे, मावसा शिवशंकर आणि मामा गोपाळ खंडारे हे तरुणाच्या घरी आले. दुसऱ्याच दिवशी १९ फेब्रुवारी रोजी तातडीने लग्न लावून देण्यात आले. पैसे मिळताच एजंट आणि वधूचे नातेवाईक लग्नमंडपातून निघून गेले.

    २२ फेब्रुवारी रोजी रात्री सर्वजण झोपल्यानंतर वधू पूजा गावडे अचानक घरातून गायब झाली. सकाळी घरच्यांनी पाहिले असता, ती ८४ हजार रुपयांचे मणी-मंगळसूत्र, कर्णफुले आणि सोनपोत घेऊन पसार झाल्याचे लक्षात आले.

    तरुणाने एजंट आणि वधूच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर, फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर तरुणाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार एजंट आशाबाई, पूजा गावडे, निर्मलाबाई डोंगरे आणि शिवशंकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करत आहेत.

    #crime #fraud jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif