अडावद:– जळगाव तालुक्यातील कठोरा येथील रहिवासी असलेल्या 33 वर्षीय युवकाला दुप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखवून सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अडावद येथील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जळगाव तालुक्यातील कठोरा येथे राहणारे रवींद्र नारायण पाटील वय 33 याला संशयित किरण उर्फ भैय्या ज्ञानेश्वर कोळी, गोविंदा ज्ञानेश्वर कोळी, भारती गोविंदा कोळी, सागर सुरेश कोळी सर्व राहणार इंदिरानगर प्लॉट अडावद तालुका चोपडा यांनी रवींद्र पाटील यांना तुम्हाला दुप्पट पैसे करून देतो असे सांगून विश्वासात घेऊन त्यांच्याकडून 23 मे 2023 रोजी दुपारी १२रा वाजता तसेच 24 मे 2023 रोजी साडेदहा वाजता अडावद गावात प्लॉट भागात तसेच औरंगाबाद शहरामध्ये एकूण सहा लाख रुपये घेतले. मात्र रवींद्र पाटील यांनी दिलेले सहा लाख रुपये परत करण्याची मागणी केली असता त्यांनी रवींद्र पाटील यांना मारहाण करून त्यांच्या पत्नीलाही धमकी दिली. त्यामुळे रवींद्र पाटील यांनी अडावद पोलीस स्टेशनला धाव घेऊन संशयित किरण कोळी, गोविंदा कोळी, भारती कोळी ,सागर कोळी यांच्याविरुद्ध 16 सप्टेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास फिर्याद दिल्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा करीत आहे.



