पाचोरा : येथील निर्मल सिडस् प्रा. लि. ही कंपनी बि-बियाणे क्षेत्रातील एक नामांकीत कंपनी असून तिचा देशभर विस्तार आहे.
या लोकप्रियतेचा फायदा घेऊन हरियाणा राज्यातील कर्नाल येथे एका बनावट व्यावसायिकाने निर्मल ब्रान्ड, व्यापारी चिन्हाची नावाची नक्कल करून न्यू निर्मल सिडस या नावाने कंपनी सुरु केली होती. तर बाजारात बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली होती. या प्रकरणी त्याविरुद्ध याचिका दाखल केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याविरूद्ध इंटेरिम ऑर्डर पारीत करून या बोगस कंपनी विरुध्द कार्यवाही करून तिने उत्पादित केलेल्या बनावट मालाला सील केले आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी निर्मल सिडस्च्या इतर उत्पादनांचे नाव व नक्कल करत असल्याचे निदर्शनात आले आहे, त्यांच्याविरुध्द ही कंपनीने कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. अशा बनावट करणाऱ्या ठिकाणी भारतात कुठेही छापे टाकून, जप्ती करुन गुन्हेगारांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे कंपनीने कळवले आहे.