Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यातील चार गाड्यांचा अपघात
    अपघात

    श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यातील चार गाड्यांचा अपघात

    गाड्यांचे नुकसान : शिवसंवाद यात्रेदरम्यान अपघात
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 28, 2026No Comments240 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील चार गाड्यांचा अपघात झाला आहे. श्रीकांत शिंदे हे नांदेडच्या दौऱ्यावर होते. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु अपघातामुळे गाड्यांचे नुकसान झाले आहे. ते नांदेडमध्ये शिवसंवाद यात्रेवर होते. यावेळीच त्यांच्या ताफ्यात असलेल्या गाड्यांच्या अपघात झालेला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत शिंदे यांचा ताफा नांदेडहून नायगावकडे जात होता. याच वेळी समोरून एक गाडी आली आणि ताफ्यातील चार गाड्या एकमेकांवर आदळल्या. यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु ताफ्यातील गाड्यांचे नुकसान झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ताफ्याती अपघात झालेल्या गाड्यांमध्ये श्रीकांत शिंदे यांचे काही कार्यकर्ते होते. तसेच आरोग्य विभागातील काही कर्मचारी होते. गाड्या एकमेकांवर आदळलेल्या असल्या तरी यात कोणीही जखमी झालेले नाही.

    दरम्यान नांदेडच्या दौऱ्यावर असताना त्यांनी नायगाव, मुखेड आणि देगलूर विधानसभा आढावा बैठक घेतली. यावेळी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी, बूथनिहाय नियोजन, ग्रामीण भागातील पक्ष विस्तार आणि जनसंपर्क अभियान या विषयांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली. तसेच प्रत्येक गाव, वाडी आणि घराघरापर्यंत शिवसेनेचा विचार पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने मैदानात उतरावे, जनतेमध्ये सातत्याने संपर्क ठेवावा आणि स्थानिक प्रश्नांवर तत्काळ पाठपुरावा करावा, अशा सूचना यावेळी श्रीकांत शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केल्या.

    शिवसेना केवळ पक्ष नाही, तर सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणारी ताकद आहे. ही ताकद आणखी मजबूत करायची असेल, तर प्रत्येक शिवसैनिकाने पूर्ण क्षमतेने आणि प्रामाणिकपणे कामाला लागणे गरजेचे आहे,” असे आवाहन यावेळी श्रीकांत शिंदे यांनी केले. तसेच एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदार यादी अद्ययावत ठेवणे, नवीन मतदार नोंदणी, युवा मतदार आणि लाभार्थ्यांशी थेट संपर्क वाढवणे, तसेच प्रत्येक बूथवर संघटनेची ताकद वाढवणे यावर विशेष भर देण्यात आला.

    बीएलए, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी बूथस्तरावर अधिक सक्रिय राहून संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवायचा असेल, तर सर्वांनी पूर्णपणे झोकून देऊन काम करणे फार महत्वाचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करत सर्वांनी पक्षबांधणीसाठी जोमाने काम करावे असेही त्यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif