Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»नाल्यात आंघोळीस गेलेल्या तरुणांचे चार मोबाईल चोरीला
    गुन्हे वार्ता

    नाल्यात आंघोळीस गेलेल्या तरुणांचे चार मोबाईल चोरीला

    मोहमंडळी परिसरातील घटना : 41 हजारांचा मुद्देमाल लंपास
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 5, 2026No Comments141 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    रावेर

    रावेर तालुक्यातील रोझोदा येथे मोहमंडळी परिसरातील नाल्यात आंघोळीस गेलेल्या चार तरुणांचे कपड्यांमध्ये ठेवलेले मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल बबलू पिंजारी (वय 18, रा. रोजोदा, ता. रावेर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दि. 3 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे मित्र मोहमंडळी येथील नाल्यात आंघोळीसाठी गेले होते. त्यांनी आपले कपडे आणि मोबाईल नाल्याच्या काठावर ठेवले असता अज्ञात चोरट्याने संधी साधून मोबाईल चोरून नेले. यात चार मोबाईल फोनचा समावेश असून त्यांची एकूण किंमत 41 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

    या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार मेहरबान तडवी करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    धानोऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर डल्ला!

    August 9, 2026

    15 ऑगस्टपूर्वी मुंबईत स्फोट घडवण्याची धमकी

    August 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif