Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    • गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
    गुन्हे वार्ता

    टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

    पती-पत्नीने दोन मुलांसह जीवन संपविल्याची घटना; पहाटे रेल्वे मार्गावर आढळले मृतदेह
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 27, 2026No Comments814 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    अमळनेर

    तालुक्यातील टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा रेल्वे मार्गावर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २७ ऑगस्ट रोजी पहाटे ४ ते ५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने टाकरखेडा गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल, त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल आणि त्यांची दोन मुले सनी व राज हे पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर चौघांचा रेल्वे मार्गावर मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

    पहाटे सुमारे ४.४० वाजता रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याची कार्यवाही केली.

    या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक कारणातून ही घटना घडल्याची चर्चा परिसरात सुरू असली, तरी अधिकृत कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

    एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने टाकरखेडा गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026

    गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif