जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
रोटरीचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष असलेले कल्याण बॅनर्जी पदग्रहण सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून रविवारी जळगावात येत आहे. शहरातील सर्वात पहिला व अमृत महोत्सवी वर्षाची वाटचाल केलेल्या रोटरी क्लब जळगावचा पदग्रहण सोहळा रविवार २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता जैन हिल्स, गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
याप्रसंगी कल्याण बॅनर्जी यांची प्रमुख अतिथी म्हणून तसेच रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे (नाशिक), जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे चेअरमन अशोक जैन, सहप्रांतपाल डॉ. अपर्णा भट – कासार यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी दिली.
रोटरी वर्ष २०२५-२६ साठी रोटरी क्लब जळगावच्या नूतन कार्यकारणी मध्ये अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, उपाध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे, मानद सचिव सुभाष अमळनेरकर, कम्युनिकेशन सेक्रेटरी पंकज व्यवहारे, सहसचिव स्वाती ढाके, कोषाध्यक्ष उदय पोतदार, आयपीपी ॲड. सागर चित्रे तसेच संचालक म्हणून प्रेम कोगटा, डॉ. प्रदीप जोशी, राघवेंद्र काबरा, डॉ. जयंत जहागिरदार, डॉ. तुषार फिरके, जितेंद्र ढाके, संदीप शर्मा, राजेश वेद, मनोज जोशी, योगेश गांधी, डॉ. काजल फिरके, प्रा. डॉ. शुभदा कुलकर्णी, राजेश यावलकर, पराग अग्रवाल, चंदन महाजन, रितेश जैन, राकेश चव्हाण, विजय जोशी व कायम निमंत्रित संचालक म्हणून छबीलदास शाह यांचा समावेश आहे.