बेंगळुरू, लोकशाही न्यूज नेटवर्क
बेंगळुरूमधून धक्कादायक घटना समोर आलीय. कर्नाटकातील माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची हत्या झाल्याची घटना घडली आहे. ओम प्रकाश यांचा राहत्या घरात मृतदेह आढळला आहे. ओम प्रकाश हे १९८१ सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांचा घरातच रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळलाय.ओम प्रकाश यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे.
पोलिसांना सशंय आहे की त्यांचा हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आलं आहे. ओम प्रकाश यांच्या मृत्यू प्रकरणात संशयाची सुई त्यांच्या पत्नीवर आहे. घटनेवेळी त्यांची बायको आणि मुलगी घरात होत्या. ओम प्रकाश यांची पत्नी कथित हत्या प्रकरणात मुख्य आरोपी होऊ शकते. पोलिसांना त्यांच्या बायकोला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून बारकाईने चौकशी सुरु आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
नेमकं काय आहे घटना ?
ओम प्रकाश बेंगळुरूतील एका घरात राहत होते. त्यांचा रविवारी घरात मृतदेह आढळला. सुरुवातीच्या तपासात माहिती समोर आले की, ‘घटनेवेळी घरात त्यांची पत्नी आणि मुलगी होती. त्यांच्या शरीरावर जखमा आहेत. त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या पत्नीने पोलिसांना फोन करून ओम प्रकाश यांच्या हत्येची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनेस्थळी पोहोचले.ओम प्रकाश यांचा मृतदेह घरात पडलेला होता. घटनेवेळी पत्नी आणि मुलगी घरात होत्या. पोलिसांकडून पत्नीची चौकशी केली जात आहे. ओम प्रकाश यांच्या हत्येमागे घरगुती वादाचं कारण असल्याचं बोललं जात आहे.