
लोकशाही न्यूज नेटवर्क
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची तब्येत पुन्हा बिघडली आहे. त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठी आढळल्या असून ब्रेन स्ट्रोकचा धोका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. कांबळीच्या जुन्या मित्रांनी आर्थिक मदतीसाठी एका व्हॉट्सअॅप ग्रुप देखील बनवला आहे. या ग्रुपमध्ये सचिन तेंडुलकर देखील आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने दारू पिणे सोडले आहे. परंतु त्याची स्मरणशक्ती कमकुवत झाली आहे. यामुळे सिगारेट ओढण्याचा चुका कांबळी करताना दिसतो. यामुळे त्याला ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढला आहे. ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात युरिनरी इन्फेक्शनचा उपचार केल्यानंतर ५४ वर्षीय विनोद कांबळी बरा झाला होता. त्यानंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा झाल्या होत्या होत्या. परंतु काही महिन्यानंतर त्याची तब्येत पुन्हा बिघडली. त्याला नीट उभे राहणेही अवघड झालं होतं.
कांबळीच्या मित्राने सांगितलं की, ‘डॉक्टरांच्या उपचारानंतर कांबळी थोडाफार चालू लागला आहे.परंतु स्मरणशक्तीची समस्या कमी झालेली नाही. त्याला आता जुन्या गोष्टी आठवत नाहीये. कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठी असल्याने त्याला मेंदूचा धोका वाढला आहे’.
कांबळीचा मित्र मार्क्स कूटो याने सांगितलं की, ‘मी जुन्या मित्रांचा व्हॉट्सग्रुप तयार केला आहे. यात बहुतेक माजी क्रिकेटपटू आहे. ते नाव न जाहीर करता आर्थिक मदत करत असतात. विनोदची स्मरणशक्ती कमकुवत आहे. मागील सहा महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एखादी जुनी गोष्ट आठवण्यासाठी बराच वेळ लागतो. त्याच्या मेंदूत रक्ती गाठी आहेत. त्यामुळे त्याला ब्रेन स्ट्रोकचा धोका देखील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. तो इच्छाशक्तीच्या बळावर उपचारांना प्रतिसाद देत आहे’.

