लोकशाही संपादकीय लेख
नवी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मद्य घोटाळा प्रकरणी सीबीआयने केलेली कारवाई आणि अटक ही कोर्टाने बेकायदेशीर ठरवली असून त्यांना या मध्य घोटाळ्यातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सहा महिने आणि मनीष सिसोदिया यांना दोन वर्ष जेलमध्ये राहावे लागले. दरम्यानच्या काळात नवी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यात भाजप बहुमताने विजयी झाले आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे मुख्यमंत्री विराजमान झाले. दिल्लीच्या सत्तेतून अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आप आम आदमी पार्टी अल्पमतात आला. सीटिंग मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री असताना देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अटक झाली. इतकेच नव्हे ते केजरीवाल यांना धरून अटक केली. आज दिल्ली कोर्टाने अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना निर्दोष मुक्त केल्यानंतर केजरीवाल भावुक झाले. त्यांना शब्द फुटेना, त्यांना रडू कोसळले. माझा आणि आमच्या पक्षाचा कसलाही गुन्हा नसताना आम्हाला अटक केली. जेलमध्ये ठेवण्यात आले. गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय सूड घेतला मात्र आम्ही चोर नाही हे कोर्टाने सिद्ध केले . आम्ही चोर असतो तर आम्ही भाजपमध्ये गेलो असतो. परंतु भाजपमध्ये जाण्याइतके आम्ही डरपोक नाही. गुजरात मध्ये जाऊन त्यांना शिव्या देणारे आम्ही आहोत. भाजपची वेगळीच चाल असते. ती म्हणजे सीबीआय इडीमार्फत त्रास द्यायचा आणि त्या त्रासाला कंटाळून आपोआप भाजपमध्ये प्रवेश करायला भाग पाडायचे. परंतु त्यापैकी आम्ही नाही. भाजपने आता जरी नवी दिल्लीच्या निवडणुका घेतल्या तर त्यांच्या दहा जागाही निवडून येणार नाहीत, हे माझे त्यांना चॅलेंज आहे. दरम्यान समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रथमच तोंड उघडले असून अरविंद केजीवाल यांच्या कोर्ट निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, या देशात न्याय व्यवस्था आहे, म्हणून बऱ्याच गोष्टींवर अंकुश आहे. अन्यथा नंगानाच घालायला घातला गेला असता. अरविंद केजरीवाल यांना अटक झाली तेव्हा अण्णा हजारे काहीच बोलले नव्हते. परंतु आता बोलण्याचे कारण म्हणजे कोर्टाने त्यांना निर्दोष सोडले आहे. अरविंद केजरीवाल यांच्याकडे मी एक समाजसेवक या नात्याने पाहतो. त्यामुळे एका समाजसेवकावर झालेल्या अन्याय दूर झालेला आहे. म्हणून मी अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी उभा राहून त्यांचे स्वागत करतो आहे. याबाबत दिल्ली कोर्टाच्या निर्णयानंतर सीबीआय तर्फे हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नवी दिल्लीमध्ये पोस्टर लागले आहेत, की अजून सुटले नाही. अजून हाय कोर्टात निर्णय यायचा बाकी आहे. हे भाजपचे पोस्टर खूणशीपणा दाखवतात.
दिल्ली कोर्टाच्या निर्णयानंतर हायकोर्टात अपील करणे हे सीबीआय इन्स्टिट्यूटतर्फे करण्यात येत आहे. ‘जो बूंद से गई वो हौद से नही आती.’ एकदा खालच्या कोर्टात निर्णय झाला तो झाला. त्या कोर्टात सलगपणे केस चालली. सर्व पुरावे सादर केले तरी कुठलाही पुरावा सिद्ध झाला नाही. सर्व पुरावे सादर होऊनही आरोप सिद्ध झाले नाहीत. सर्व पुरावे फेटाळले गेले. एकही पुरावा अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या बाजूने सिद्ध झाला नाही. त्यामुळे पुराव्या अभावी दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे. आता एक केवळ तांत्रिक बाब म्हणून आपल्याला जायचे आहे. या केस मध्ये झालेल्या शासनाचा पर्यायाने सीबीआय इडीचा जो पराभव झाला आहे. तो मोदी शहांचा पराभव समजला जातोय. दोघांच्या खूनशीपणाचा हा पराजय आहे. खूनशीपणाचा वापर करून निवडणुका जिंकलेल्या आहेत. आता पुन्हा नव्याने केजरीवाल यांनी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओपन चॅलेंज दिले आहे. अरविंद केजरीवाल म्हणतात की, आम आदमी पार्टी ही देशात भाजपला टक्कर देणारी पार्टी आहे. त्यामुळे अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे आम आदमी पार्टीला घाबरतात. या निकालाने फार मोठा कोर्ट निर्णय झाल्यामुळे इतिहासात या निर्णयाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्या मद्य घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती, त्यामागे सीबीआय आणि ईडीचे षडयंत्र होते. आतापर्यंत सीबीआय आणि ईडी तर्फे टाकण्यात आलेल्या धाडींपैकी फक्त 20% केसेस मध्ये केस चालली आहे. बाकी 80 टक्के केसेसचा निकाल पुराव्या अभावी लागलेलाच नाही. त्यातल्या त्यात विरोधकांच्या बाबतीत सीबीआय ईडीच्या धाडी टाकल्या जातात. भाजपमधील एकावरही केस दाखल होत नाही. त्यामुळे विरोधकांसाठी भाजपचे हे एक अस्त्र आहे, असे म्हटले जाते ते काही वावगे नाही. मध्यंतरी संजय राऊत आणि संजय सिंग यांच्याकडेही केसेस दाखल करून अटक करण्यात आली होती. ते कोर्टातून पुराव्या अभावी निर्दोष सुटले पण हऱ्यासमेंट झाली, त्याचे काय..!