Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»इतिहासात पहिल्यांदाच ईव्हीएम तपासण्याचे आदेश
    राजकारण

    इतिहासात पहिल्यांदाच ईव्हीएम तपासण्याचे आदेश

    मुंबई हायकोर्टाचा आदेश : काय आहे नेमके प्रकरण?
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 10, 2026No Comments316 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यात बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची धामधूम सुरू आहे. तर इकडे देशातील निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच ईव्हीएम तपासण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. चांदिवली विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काँग्रेसचे पराभूत उमेदवार नसीम खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हा निकाल देण्यात आला.

    एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे हे 2024 मधील विधानसभा निवडणुकीत मुंबई उपनगरमधील चांदिवली मतदारसंघात शड्डू ठोकून होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे दिग्गज उमेदवार नसीम खान होते. नसीम खान यांचा हा मतदारसंघ बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जात होता. पण या निवडणुकीत दिलीप लांडे यांनी नसीम खान यांचा पराभव केला. या निकालाविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी याप्रकरणी गडबड झाल्याची बाजू मांडली.

    न्यायालयाने त्यांचे मुद्दे लक्षात घेत, गुरुवारी ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिली आहे. ईव्हीएम उत्पादक बंगळुरू येथील कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून येत्या 16 आणि 17 एप्रिल रोजी मुंबईत ही चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याविषयीचे पत्र मुंबई उपनगर जिल्ह्याचे उप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नसीम खान यांना पाठवले आहे. त्यात याविषयीची माहिती देण्यात आली आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांनी हा निकाल दिला आहे.

    2009 आणि 2014 च्या निवडणुकीत नसीम खान हे चांदिवली विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. पण त्यानंतर सलग दोनदा, 2019 आणि 2024 या निवडणुकीत दिलीप लांडे यांनी त्यांचा पराभव केला आहे. पण यावेळी नसीम खान यांनी या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांनी निवडणूक याचिका दाखल केली होती. न्यायालयाचा निकाल हा ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया नसीम खान यांनी दिली आहे. राहुल गांधी हे सातत्याने ईव्हीएमवर शंका उपस्थित करत असताना आणि पत्रकार परिषदेतून हल्लाबोल करत असताना या निकालामुळे विरोधकांना मोठा दिलासा दिल्याचे मानले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भाजप कार्यालय फोडलं : १५-२० हल्लेखोरांचा हल्ला!

    May 12, 2026

    तामिळनाडूत पुन्हा ट्विस्ट : अण्णाद्रमुक पक्षात फुट!

    May 12, 2026

    लाडकी बहीण योजनेने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले!

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif