आमदारांन पाठोपाठ पालकमंत्री हि गुवाहाटीच्या दिशेने रवाना !

0

जळगाव | आमदार यांच्या पाठोपाठ पालकमंत्री गुलाबराव पाटील (MLA Gulabrao Patil Jalgaon)  हे देखील गुवाहाटीच्या दिशेने निघाले असल्याने आता जिल्ह्यातील शिवसेनेचे चारही आमदार हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर शिवसेना समर्थक चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांचाही हाच पवित्रा असू शकतो अशी माहिती समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील चिमणराव पाटील, किशोरआप्पा पाटील आणि लताताई सोनवणे हे तीन आमदार पहिल्यापासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे दिसून आले होते. याप्रसंगी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे पक्षासोबत उभे असल्याचे चित्र होते. आज सकाळी मात्र हे चित्र बदलले असून ते नॉट-रिचेबल झाले आहेत. ते गुवाहाटीच्या दिशेने निघाल्याची माहिती असून याचे वृत्त अनेक वाहिन्यांनी दिले आहे. तर मुक्ताईनगरचे शिवसेना समर्थक आमदार चंद्रकांत पाटील हे मुंबईला निघाले असून ते तेथून गुवाहाटीत जाणार असल्याचे वृत्त देखील समोर आले आहे. या माध्यमातून शिवसेनेचा चार तर शिवसेना समर्थक एक असे पाचही आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.