Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»हिमाचलमध्ये खून करून पळाले, जळगावात पोलिसांच्या जाळ्यात!
    गुन्हे वार्ता

    हिमाचलमध्ये खून करून पळाले, जळगावात पोलिसांच्या जाळ्यात!

    ‘या’ कारणासाठी उतरले अन् पोलीस कारवाईत अडकले
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 1, 2026No Comments485 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    हिमाचल प्रदेशातील खून प्रकरणात फरार असलेल्या चार संशयित आरोपींना शनिपेठ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जळगाव शहरातून ताब्यात घेतले. हिमाचल प्रदेश पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शनिपेठ पोलिसांनी तत्काळ हालचाली करत ही कारवाई केली.

    हिमाचल प्रदेश पोलिसांनी शनिपेठ पोलिसांशी संपर्क साधून मुकेश कुमार यांच्या खूनप्रकरणी एफआयआर क्रमांक ८२/२०२६, दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी दाखल झाल्याची माहिती दिली होती. प्राथमिक माहितीनुसार, मयत आणि आरोपी एकत्र दारू पीत असताना मयताने आरोपींच्या बहिणीवरून शिवीगाळ केल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर रागाच्या भरात आरोपींनी मुकेश कुमार यांचा खून करून मृतदेह तलावात फेकल्याचे पोलिसांच्या माहितीत नमूद आहे.

    खून केल्यानंतर आरोपी दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता किसनपूर येथून निघाले. त्यानंतर अंबाला येथे पोहोचल्यानंतर त्यांनी ११०५८ अमृतसर-मुंबई एक्स्प्रेसने दुपारी साडेचारच्या सुमारास मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला. प्रवासादरम्यान पैसे संपल्याने आणि भूक लागल्याने मोबाईल विकण्यासाठी ते जळगाव येथे उतरल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

    या प्रकरणात चंदन कुमार विलास मुखिया, रोशन गोगल मुखिया, संतोष कुमार देविंदर साह आणि अजित कुमार जोगा मेहतो यांचा सक्रियपणे शोध सुरू होता. त्यांचे लोकेशन शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्याचे निदर्शनास आल्यानंतर हिमाचल पोलिसांनी शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना याबाबत माहिती दिली.

    माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जयस्वाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन गुन्हे शोध पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार परि. पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर, अभिषेक कटारे, पोहेकॉ विजय खैरे, योगेश जाधव, अनिल साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे, नवजीत चौधरी, अमोल वंजारी, पराग दुसाने आणि पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र साबळे यांच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली.

    तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मोठ्या शिताफीने चौघांना शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले. याबाबतची माहिती हिमाचल प्रदेशातील संबंधित मानपुरा पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यांच्याशी समन्वय साधण्यात आला आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणपुरे आणि शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026

    वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif