Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    गुन्हे वार्ता

    बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!

    नवापूर एमआयडीसीत वनविभागाचा मोठा दणका
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 17, 2026No Comments130 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    नवापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    नवापूर एमआयडीसी परिसरात बिबट्या या संरक्षित वन्यप्राण्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीचा वनविभागाने पर्दाफाश केला आहे. वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो (मुंबई) आणि स्थानिक वनविभागाच्या संयुक्त पथकाने केलेल्या या धडक कारवाईत पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून बिबट्याची कातडी आणि चार वाहने जप्त करण्यात आली आहेत.

    गोपनीय माहितीनुसार, काही इसम बिबट्याच्या कातडीचे तुकडे विक्रीसाठी नवापूर परिसरात येणार होते. या माहितीची दखल घेत मुंबई येथील वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरोचे पथक आणि नंदुरबारचे सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. यामध्ये नंदुरबार, चिंचपाडा आणि नवापूर प्रादेशिक वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या पथकाने नवापूर एमआयडीसी परिसरात सापळा रचला. संशयित आरोपी पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट कार (क्रमांक: GJ 26 A 1513) आणि तीन दुचाकींवरून बिबट्याच्या कातडीचे तुकडे घेऊन जात असताना, वनविभागाच्या पथकाने त्यांना अडवून त्यांची झडती घेतली. यावेळी त्यांच्याकडे बिबट्याच्या कातडीचे तुकडे मिळून आले.

    पथकाने तात्काळ पाचही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील कार आणि तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. ताब्यात घेतलेले आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल नवापूर येथील मध्यवर्ती रोपवाटिकेमध्ये आणण्यात आला आहे. या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कातडी कोठून आणली आणि याचे जाळे कुठेपर्यंत पसरलेले आहे, याचा सखोल तपास आता वनविभाग करत आहे. या कारवाईमुळे वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या आणि त्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या रॅकेटमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif